मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील जाहिरात होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. esakal
नागपूर

Amaravati News :आता तरी मनपा प्रशासनाला जाग येईल का?

Hording in Amaravati : माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा मनपाला सवाल

सकाळ वृत्तसेवा

Nagpur : इर्विन चौक येथील इमारतीवरील मोठे होर्डिंग्ज पावसाने कोसळण्याची घटना घडली असतानाही अमरावती महापालिकेस अवैध होर्डिंग्ज काढण्याची सद्बुद्धी सुचली नाही, हे दुर्दैव आहे. या घटनांमधून तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अमरावती महानगरपालिका व त्याचे प्रशासक बोध घेतील का? असा प्रश्न माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील जाहिरात होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशीच घटना काही दिवसांपूर्वी अमरावती शहरातसुद्धा घडली होती. अवकाळी पावसामध्ये आलेल्या वादळाने काही दिवसांपूर्वी शहरातील मध्य भागातील इर्विन चौक येथील असेच एका उंच इमारतीवर लावलेले मोठे जाहिरातीचे होर्डिंग पडले होते.

सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.परंतु याउपरही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अमरावती महानगरपालिका व त्याचे प्रशासक यांनी कोणताही बोध घेत नसल्याचे डॉ. सुनील देशमुख यांनी म्हटले आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांसह मुख्य बाजारपेठेत रस्त्यालगत असलेल्या मोठ्या उंच इमारतींच्या वर अवाढव्य आकाराचे असले होर्डिंग मोठ्या प्रमाणात लावले गेलेले आहेत. यापैकी किती अधिकृत, किती अनधिकृत आहेत याची मोजदाद मनपा प्रशासनाकडे आहे की नाही, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट ते मजबुतीने उभे आहेत की नाहीत, याचे स्टॅबिलिटी चेकिंग करण्यात येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याची साधी तसदीसुद्धा प्रशासनाकडून घेतल्या जात नाही.यासोबतच सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु खबरदारी म्हणून हे सगळे सुरक्षा उपाय योजण्याची जबाबदारी कोणी अधिकारी घेणार आहे की त्याकरिता सुद्धा एखाद्या निष्पाप जिवाचा बळी जाण्याची प्रशासन वाट बघत आहे, असा प्रश्न डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

मॉन्सून पूर्व अवकाळी पाऊस आणि लगतच येणारा पावसाळा या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात एखाद्या जीवितहानी प्रकरणी मनपा अधिकाऱ्यांवरच सदोष मनुष्यवधाचा दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असे घडल्यास संबंधित अधिकारी व त्यांच्या वरिष्ठांवर मनुष्यवधाचा गुन्हा निश्चित दाखल करण्यात येईल, असा इशारा डॉ. सुनील देशमुख यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT