The murder of a criminal on his way out of prison Gangwar is likely to break out in Nagpur 
नागपूर

जेलमधून बाहेर येताच गुन्हेगाराचा खून; नागपुरात गॅंगवार भडकण्याची शक्यता

अनिल कांबळे

नागपूर : जामीनावर कारागृहाबाहेर येताच चार जणांनी कुख्यात गुंड व साथीदारावर हल्ला केला. यात कुख्यात गुंडाचा मृत्यू झाला असून साथीदार पळून गेल्याने बचावला. हे थरारक हत्याकांड सोमवारी रात्री सात वाजताच्या सुमारात खामला ते जयताळा मार्गावरील लंडन स्ट्रीटच्या खुल्या भागात घडला. नीलेश राजेश नायडू (वय ३१, रा. खामला) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रतीक सहारे असे जखमीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात नीलेशविरुद्ध यापूर्वीचे लुटमार, खून, खुनाचा प्रयत्न आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो कारागृहात होता. तीन दिवसांपूर्वीच शुक्रवारी तो जामिनावर कारागृहाबाहेर आला. सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तो लंडन स्ट्रीटच्या बाजूला आलेल्या मैदानात मित्र प्रतीकसह दारू पित बसला होता.

त्यावेळी चार युवत तेथे आले. त्यांच्याकडे चाकू व रॉड होता. दोघांनाही त्यांनी घेरले. दोघांवरही त्यांनी हल्ला केला. त्यावेळी प्रतीकच्या पायावर चाकू लागला. पण, तो लंगडत पळून गेला. आरोपींच्या हाती नीलेश लागला. नीलेशला घेरले व त्याच्यावर शस्त्रांनी वार केले. त्यानंतर दगडाने ठेचले. प्रतीक हा मदतीसाठी रस्त्यावर आला. त्याने पोलिसांना माहिती दिली.

सोनेगाव पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी पळून गेले होते. मारेकरी कोण आहे, हे स्पष्ट झाले नाही. पण, गुन्हेगारी व वर्चस्वाच्या वादातूनच त्याचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिस वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींबाबत अद्याप कोणताही सुगावा लागला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Election : 'गोकुळ'मध्ये अरुण नरके गट महायुतीसोबत! शाहूवाडीतील सरुडकर गटही वाटेवर, आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का?

Ram Shinde : विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार : राम शिंदे

Latest Marathi News Live Update : भीमराव कांबळेला कोर्टात हजर केले

'मी विरार फास्ट लोकलमधून उडी मारलेली...' अभिनेत्री मुग्धा शाह यांनी सांगितला आयुष्यातील धक्कादायक प्रसंग, म्हणाल्या...

Satara Rain Update : साताऱ्यासह विविध भागांत दमदार पाऊस; रस्‍ते जलमय; उत्तर खटाव परिसरात नदी, नाले प्रवाहित, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

SCROLL FOR NEXT