murder 
नागपूर

खिशातून पाचशे रुपये काढले म्हणून केला मित्राचा खून...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खिशातून पाचशे रूपये हिसकल्यामुळे राग अनावर झाल्याने युवकाने एका मित्राचा चाकूने भोसकून खून केला. हा थरार पाचपावलीतील सिद्धार्थनगरात घडला. विक्‍की उर्फ विठ्‌ठल सिद्धार्थ बागडे (वय 20) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पाचपावली पोलिसांनी आरोपीस अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्‍की बागडे हा पाचपावली परिसरात टोळी तयार करून दादागिरी करीत होता. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विक्‍कीचा दबदबा होता. आज रविवारी दुपारी विक्‍कीची आरोपी प्रभाकर मेश्राम (वय 50) याची भेट झाली. विक्‍कीने प्रभाकरला पैसे मागितले. मात्र, प्रभाकरने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे विक्‍कीने प्रभाकरच्या खिशातून बळजबरीने पाचशे रूपये काढले. पोलिसात तक्रार केल्यास 'गेम' करण्याची धमकी दिली. यापूर्वीही विक्‍की आणि त्याची टोळी प्रभाकरला त्रास देत होती. त्यामुळे प्रभाकर विक्‍कीच्या त्रासाला कंटाळला होता. पाचशे रूपये हिसकल्यामुळे प्रभाकरचा पारा चढलेला होता.

सायंकाळच्या सुमारास विक्‍की सिद्धार्थनगर, टेका येथे उभा होता. प्रभाकरने त्याला पैसे परत मागितले. मात्र, विक्‍कीने त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे प्रभाकरने खिशातून चाकू काढून विक्‍कीच्या पोटात भोसकला आणि पळून गेला. विक्‍कीच्या मित्रांनी त्याला मेयोत नेले. मात्र, रस्त्यातच विक्‍कीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी प्रभाकरविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना दिले जाणारे सर्व उपचार त्यांच्या संमतीनेच केले जात आहेत - मेदान्ता रुग्णालय

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT