murder 
नागपूर

लग्न करण्यावरून झाला वाद... प्रियकराने प्रेयसीला नेले बेसमेंटमध्ये...मग

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तीन वर्षांपासूनच्या प्रेमसंबंधात वितुष्ट आल्यामुळे प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून केला. ही खळबळजनक घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास सदरमधील मंगळवारी कॉम्प्लेक्‍समध्ये उघडकीस आली. हुस्ना किस्मत (वय 21) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तर आसिफ शेख (वय 26) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. त्याला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुस्ना शेख ही सीताबर्डीतील एका नामांकित मोबाईल शॉपीमध्ये सेल्सगर्ल म्हणून कामावर होती. गेल्या तीन वर्षापूर्वी हुस्नाची आसिफ शेख याच्याशी ओळख झाली. आसिफ हा ट्रक चालक आहे. दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या वारंवार भेटी होत गेल्या. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही आपापल्या कुटुंबीयांना लग्नासाठी तयार करीत होते. मात्र, दोघांच्याही घरून लग्नास विरोध होता.

दरम्यान हुस्नाने वारंवार लग्नासाठी तगादा लावला. त्याने तिची समजूत काढून जानेवारी 2020 मध्ये लग्न करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, घरच्यांचा विरोध पाहता त्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. घरातील परिस्थिती सुधारल्यावर लग्नाचा विचार करण्याचे त्याने हुस्नाला सांगितले. मात्र, हुस्ना लग्नाच्या निर्णयावर ठाम राहिली.

स्कार्फने गळा आवळला

रविवार असल्यामुळे दोघांनी भेटायचे ठरविले. रविवारी सायंकाळी दोघेही सदरमधील मंगळवारी बाजारात भेटले. लग्नाच्या कारणावरून दोघांत वाद झाला. आसिफने तिची समजूत घालत तिला शारदा चौकात फिरायला नेले. तेथे त्यांनी नाश्‍ता केला आणि पुन्हा मंगळवारी बाजारात परतले. रात्रीच्या सुमारास त्याने हुस्नाला एका कॉम्प्लेक्‍सच्या बेसमेंटमध्ये नेले. लग्नाच्या तगाद्यावरून पुन्हा वाद झाला. त्यानंतर आसिफने हुस्नाच्या गळ्यातील स्कार्फने तिचा गळा आवळला. ती मृत झाल्याचे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढला.

आज (सोमवारी) सकाळी इमारतीच्या बेसमेंटमध्ये एका युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी लगेच सदर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन मेयोत रवाना केला. या प्रकरणी सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान गिट्‌टीखदान पोलिसांनी आसिफ शेखला अटक केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT