नागपूर

भिख्खू निवासात पुरुष भंतेने केली महिला भंतेची हत्या

दिलीप गजभिये

खापरखेडा (जि. नागपूर) : खापरखेडा पोलिस ठाणेअंतर्गत पिपळा डाकबंगला येथील शिवली बोधी भिख्खू निवासात भंतेजीने महिला भंतेजीची हत्या केली. ही घटना रविवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सामनेरी बुद्ध प्रिया ऊर्फ कुसुम सुनील चव्हाण (वय ४५, रा. इंदिरानगर, पेट्रोल पंप जवळ, जरीपटका पोलिस स्टेशन समोर) असे मृत महिला भंतेजीचे नाव आहे. तर भदंत धम्मानंद थेरो ऊर्फ रामदास झिनुजी मेश्राम (वय ५८. रा. पिंपळा डाग बंगला, मूळ गाव यशोधरानगर, संजय गांधीनगर वॉर्ड नंबर २, फेजपुर, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंते भदंत धम्मानंद थेरो याने मृत महिला भंते सामनेर बुद्ध प्रियावर भाजी कापण्याच्या तीन चाकूने गळ्यावर सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. इतकेच नव्हे तर तोंडावर हातोडा मारून हत्या केली. शिवली बोधी भिख्खू निवास हे मागील २०१७ पासून पिंपळा डाग बंगला येथे लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरू आले.

भिख्खू निवासाच्या बाजूलाच मृत महिलेचा प्लॉट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आरोपी हा तो प्लॉट हडप करण्याच्या बेतात होता. मृत व आरोपी या दोघांमध्ये नेहमीचे खटके उडायचे. मृत महिलाही नागपूरवरून अधूनमधून ये-जा करीत होती. तिने बदनामी केल्यामुळे आरोपी त्रस्त झाला होता. भिख्खू निवासात प्रिया पलंगावर झोपल्याची संधी साधून भाजी कापण्याच्या तीन चाकूने सपासप वार केले. शिवाय तोंडावर व डोक्यावर हातोडा मारून हत्या केली.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. लागलीच खापरखेडा पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उमेश ठाकरे, नूमान शेख यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आला. प्लॉटच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची चर्चा परिसरात होती. घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू, हातोडा जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे. सदर घटनेतील आरोपी बोधी धम्मानंद थेरो यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

Pune Bhavani Peth Crime News: भवानी पेठेत पूर्ववैमनस्यातून १८ वर्षीय तरुणाचा खून; खडक पोलिसांकडून चौघांना अटक

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

SCROLL FOR NEXT