नागपूर

दारू पार्टीत मित्राचा खून; मित्राच्या घरी झोपण्याची जिद्द नडली

- अनिल कांबळे

नागपूर : दारू पार्टीनंतर (Alcohol party) घरी जाण्याऐवजी मित्राच्या घरी झोपण्याची जिद्द करणाऱ्या मित्राचा रॉडने हल्ला करून खून (Murder) केला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गुलशननगरमध्ये (Gulshan Nagar) उघडकीस आली. निरंजन ऊर्फ गोलू अब्रू वर्मा (वय ३०, रा. गुलशननगर) असे मृताचे तर गोलू ऊर्फ प्रमोद समालिया राय शाहू (वय २९ , रा. गुलशननगर) असे मारेकऱ्याचे नाव आहे. (Murder of a friend at a liquor party Nagpur crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद शाहू हा ट्रक ड्रायव्हर आहे तर निरंजन वर्मा हा खासगी काम करतो. दोघांची घट्‍ट मैत्री होती. मंगळवारी दोघांनी अर्धेअर्धे पैसे जमा करून दारूच्या चार बाटल्या आणल्या. ते निरंजन याच्या घरी दारू पार्टी केली. याचदरम्यान प्रमोदला कामानिमित्त बाहेर जायचे होते. त्याने निरंजन याला त्याच्या घरी जायला सांगितले. मी येथेच काही वेळ आराम करतो, असे निरंजन त्याला म्हणाला.

प्रमोद याने नकार दिला. दोघांमध्ये वाद झाला. प्रमोदने लोखंडी रॉडने निरंजन याच्या मानेवर व डोक्यावर वार केले. निरंजन बेशुद्ध झाला. प्रमोद हा झोपला. रात्री ९ वाजताच्या सुमारास त्याला जाग आली. मित्राला मारहाण केल्याचे त्याने निरंजन याचा भाऊ शेखर याला सांगितले.

शेखर घरी आला. निरंजन हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याला दिसला. शेखरने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी निरंजन याला मृत घोषित केले. शेखर याच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून प्रमोद शाहू याला अटक केली आहे.

(Murder of a friend at a liquor party Nagpur crime news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

SCROLL FOR NEXT