file photo 
नागपूर

वाढदिवसाची पार्टी जिवावर बेतली; दोघांचा खून 

सकाळ वृत्तसेवा

टाकळघाट (नागपूर) : बुटीबोरी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात दोघांचा जीव गेला. ही घटना बुटीबोरी मुख्य चौकाजवळ असलेल्या केजीएन चिकन सेंटर समोर गुरुवारच्या सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. तर अन्य दोघे जखमी झाले. इलियस जोसेफ लुईस (वय २५, रा. पांजरी ठाणा), बादल मथुराप्रसाद अमूल्ये (वय १९, रा जरीपटका, नागपूर) तर जखमी प्रीत फ्रँकी पौल (वय १९, रा. जरीपटका, नागपूर), साजू ऊर्फ क्रिस्तोफर सिमोन फ्रँसिस उरकुडे, रा. ठाणा पांजरी यांचा समावेश आहे. 

आरोपी समीर गुलाम शेख (वय ३६), ईजाज गुलाम शेख (वय ३१), शुभम शंकर वानखेडे (वय २१), साजिद कासीम शेख (वय २१), सादाम ऊर्फ मुन्ना हनिफ खान (वय १९), फिरोज गुलाम शेख (वय ३५), टिण्या ऊर्फ अर्पित रामदास किटे (वय १९) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की, तारीख ६ रोजी बुटीबोरी येथील बालभारती मैदान येथे प्रीतचा मित्र पवनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे मित्र इलियस, बादल, रशीद, तुषार, पांड्या, साजू, मिकेल सोलोमन एकत्रित आले. त्यानंतर सर्व बुटीबोरी मुख्य चौकाजवळील रशीदच्या फिश फ्राय दुकानावर गेले असता आरोपी सदाम ऊर्फ मुन्ना खान हा फिर्यादी प्रीत पौल याच्याजवळ गेला असता फिर्यादी प्रीत पौल याने सदामला ‘तू मला ओळखतो काय’ असे म्हटले असता सदामने शिवीगाळ केली. 

त्यामुळे फिर्यादी प्रीत पौल व त्याचा मित्र इलियस याने सदामला थापड मारली. त्यामुळे सदामने आपल्या मित्रांना चाकू, हत्यार घेऊन बोलावले. प्रीत पौल यास दगडाने मारले व त्याचा मित्र इलियस लुईस, बादल अमूल्ये, साजू क्रिस्तोफर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यात बादलचा जागीच मृत्यू झाला. तर इलियस व क्रिस्तोफर यांनासुद्धा जिवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले. इलियस याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. क्रिस्तोफर याच्यावर उपचार सुरू आहेत. तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी १४ आरोपीपैकी घटनेतील सात आरोपींना अटक केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT