Nagpur Sakal
नागपूर

Nagpur : वडिलांनी अबोला धरला, तो कायमचा अबोल झाला; दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वडील बोलत नसल्याचा परिणाम त्याच्या मनावर झाला.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur - शिकवणीला जात नसल्याच्या कारणावरून वडिलांनी अबोला धरला. ही बाब जिव्हारी लागल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास शांतीनगर येथील लालगंजच्या झाडे चौकात घडली.

वेद रितेश केळवदकर, असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेद दहाव्या वर्गात शिकायचा. तीन दिवसांपासून तो शिकवणी वर्गाला जात नव्हता. याबाबत वडिलांनी त्याची समजूत काढून शिकवणीला जाण्यास सांगितले; मात्र तो ऐकत नव्हता.

अखेर वडिलांनी त्याच्याशी अबोला धरला. वडील बोलत नसल्याचा परिणाम त्याच्या मनावर झाला. रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वेदने घरीच सळाखीला टॉवेल बांधून गळफास घेतला. नातेवाइकांना तो गळफास लावलेला दिसला. फास काढून त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: १८ चेंडूत ८८ धावा, ३२४ चा स्ट्राईक रेट! वैभव सुर्यवंशीचे शतक ६ धावांनी हुकलं; पठ्ठ्याने श्रीलंकेला झोडलं

Latest Marathi News Live Update : जाफराबादमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; रावसाहेब दानवेंनीही केली योगासने

Nashik-Chakan Rail: मोठा धक्का! नाशिक-चाकण रेल्वेमार्ग रद्द; १,५०० उद्योजकांच्या आशांवर पाणी, वाहतूक खर्चाचा बसणार फटका

एकामागोमाग एक सांगाडे, मातीची भांडी... हजारो वर्षांनंतर उघडलं हडप्पाचं गूढ; ASI च्या हाती मोठे पुरावे, 4 हजार वर्षांपूर्वीचं गूढ उलगडणार?

Satara Accident: देवदर्शनासाठी निघाले, पण काळाने गाठले! साताऱ्यात मिनी बस-ट्रकची भीषण धडक; दोन भाविक ठार, पाच गंभीर

SCROLL FOR NEXT