Nagpur Rain Update sakal
नागपूर

Nagpur Rain Update : नागपुरातील शेकडो वस्त्यांसह दीडशेवर गावांना पुराचा धोका; राज्यात अतिवृष्टीचा इशारा

शहरातील शेकडो वस्त्यांसह दीडशेंवर गावांना पुराचा धोका जीवितहानीची शक्यता कायम अनेक गावे डोंगराजवळ

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नागपुरातील झोपडपट्ट्यांसह शेकडो वस्त्या तसेच जिल्ह्यातील १५९ गावांना पूराचा धोका आहे. गेल्या काही वर्षात शहर व ग्रामीण भागातही पुरात अनेकजण वाहून गेले. परंतु प्रशासनाने अशा घटनांवरून धडा घेतला नसल्याने यंदाही अनेकांचा जीव धोक्यात आहे.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. यात १२ जणांचा मृत्यू झाला असून १०३ जणांना शोधण्यात यश आल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पुराचा धोका असलेल्या गावांसाठी तसेच शहरातील वस्त्यांसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

अतिवृष्टी झाल्यास मोठी हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुरामुळे नदी, नाल्या काठच्या गावांना पुराचा सर्वाधिक धोका असतो. जिल्ह्यात १५९ गावे नदी, नाल्याच्या काठावर आहे. या गावांमध्ये हजारो नागरिक राहतात.

या गावांना दरवर्षी पुराचा तडाखा बसतो. परंतु घटनेनंतरच प्रशासनाला जाग येत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे गावांमध्ये जिवित हानीची शक्यता नाकारता येत नाही.

पुराचा धोका असलेली सर्वाधिक ३४ गावे सावनेर तालुक्यात आहे. नदी काठच्या गावांच्या पुनर्वसनाचा आराखाडा तयार करण्याच्या सूचनाशहरातील शेकडो वस्त्यांसह दीडशेवर गावांना पुराचा धोका शासनाकडून देण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

परंतु त्यावर काळजीपूर्वक अंमलबजावणी झाला नसल्याचे समजते. शहरातील झोपडपट्ट्यांमधील मजूर व कामगार वर्गातील नागरिकांना अऩेक वर्षांपासून महापालिकेला दिलासा देता आला नाही. आजही शहरातील अनेक नाल्यांना संरक्षक भिंती नाही. काही नाल्याचा संरक्षक भिंती जीर्ण झाल्या आहेत.

काही वस्त्या खोलगट भागात असून गेल्या काही वर्षात बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्ते उंच झाल्याने वस्तीतील पाणी बाहेर जाण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अर्धा तास रात्री जोरात पाऊस आल्यानंतर नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे.

शहरात पुराचे पाणी शिरत असलेल्या ८५ झोपडपट्ट्या तर ४० वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरते. दरवर्षी हीच स्थिती असून यंदाही यात फरक दिसून येत नाही. केवळ बैठका घेऊन चर्चा करण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांनाही पुराचा धोका आहे.

पुराचा धोका असलेल्या गावांची संख्या

तालुका गावांची संख्या

नागपूर ग्रामीण ५

कामठी २२

हिंगणा १३

सावनेर ३४

कळमेश्वर २

उमरेड १२

भिवापूर ११

कुही ७

मौदा २१

पारशिवनी ८

काटोल ३

नरखेड १७

रामटेक ४

शहरातील धोका असलेल्या प्रमुख झोपडपट्ट्या व वस्त्या

वसंतराव नाईक झोपडपट्टी, काछीपुरा, दंतेवर झोपडपट्टी, कुंभार टोली झोपडपट्टी, सावित्रीबाई फुलेनगर, आंबेडकरनगर, सुभाषनगर, शिवनगर, धनगरपुरा, सुदामनगर, सेवानगर, राजीवनगर, संजयनगर, अमरनगर, टीव्ही टॉवर, आझादनगर मानकापूर, मोतीबाग, ज्योतीनगर, संजय गांधीनगर, इंदिरा मातानगर, धम्मदीपनगर, पंचशीलनगर, आदर्शनगर, पिवळी नदी झोपडपट्टी, ताजनगर, हिवरीनगर, इंदिरा गांधी झोपडपट्टी, संघर्षनगर, नेहरूनगर, हत्तीनाला, चंद्रनगर, काशीबाई देऊळ, धम्मनगर, अंसारनगर, गार्ड लाईन, भांडे प्लॉट, राणी भोसलेनगर, रघुजीनगर, ताजबाग, नंदनवन, चंदननगर, हसनबाग व इतर झोपडपट्ट्या.

शहरात पाणी साचणारी ठिकाणे : ६६

पुराचे पाणी शिरत असलेल्या झोपडपट्ट्या : ८५

पुराचे पाणी शिरत असलेल्या वस्त्या : ४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT