pune wagholi accident two youth killed one injured police hospital esakal
नागपूर

Nagpur: ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी; घाटंजी रोडच्या निळोणा पुलावरील घटना

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला.

सकाळ डिजिटल टीम

Truck Accident: भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता.२५) रात्री साडेनऊ वाजता यवतमाळ-घाटंजी मार्गावरील निळोणा पुलावर घडली.

कैलास वसंता दाभेकर (वय २५) व दुर्गेश बाबाराव राड्डी (वय ३०, दोघेही रा. कार्ली) अशी मृतांची नावे आहेत. विजय रामू टेकाम (वय २६, रा. कार्ली) हा गंभीर जखमी झाला. तिघेही दुचाकीने यवतमाळकडून कारेगाव यावलीकडे जात होते. दुचाकी विजय टेकाम चालवीत होता. निळोणा पुलावर भरधाव ट्रकने धडक दिली.

त्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी करताच कैलास दाभेकर याला मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेले दुर्गेश राड्डी व विजय टेकाम यांना पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आले. (Latest Marathi News)

त्यापैकी दुर्गेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी महादेव वासुदेव दाभेकर (वय २८, रा. कार्ली) याने यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT