mpsc
mpsc esakal
नागपूर

Nagpur : एका पदासाठी ५६ उमेदवार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नुकतेच आरोग्य सेवेच्या नर्सिंग विभागासाठी सहसंचालक पदासाठी जाहिरात प्रकाशित केली. प्रकाशित जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून ५६ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीच्या नियमांना धाब्यावर बसवून एका पदासाठी ५६ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा अफलातून प्रकार एमपीएससीने केला असल्याचे उघडकीस आले आहे.

स्पर्धा परीक्षेच्याच्या नियमानुसार एका पदासाठी किमान पाच जणांना बोलविण्याचा नियम आहे. मात्र एमपीएससीतर्फे सहसंचालक (नर्सिंग) या पदासाठी एक दोन...पाच दहा ...नव्हेतर तब्बल ५६ जणांना मुलाखतीसाठी बोलावले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्रकाशित जाहिरातीनुसार ५६ जण पात्र ठरले आहेत. या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास अनेक बाबी उघड झाल्या आहेत.

विशेष असे की, या पदासाठी शैक्षणिक पात्रता तसेच अनुभव महत्त्वाचा आहे. मात्र अर्ज मंजूर झालेल्या काही उमेदवारांना मुद्यामपणे बोलविण्यात आले असल्याची शंका पुढे येते. शैक्षणिक पात्रता आहे, मात्र वर्ग ३ मध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी संधी देण्यात आली आहे. वर्ग ३ मधील कर्मचारी थेट वर्ग सहसंचालक (नर्सिंग) या वर्ग१ च्या पदावर कोणत्या आधारे संधी देण्यात येत आहे, हे महाराष्ट्र आयोगाने स्पष्ट केले नाही.

वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज केले, परंतु अनुभव लक्षात घेता, या पदासाठी ते पात्र नाहीत. तर न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असतील अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, असा नियम आहे, परंतु न्यायालयीन प्रकरणामध्ये गुंतलेल्या उमेदवारांनाही या मुलाखतीला बोलावण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे.

..तर लेखी परीक्षा घ्यावी

सहसंचालक (नर्सिंग) हे एकच पद आहे. एका पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रकाशित केली. मात्र या पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले. यातील ५६ जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहेत. यावरून यांचे अर्ज वैध ठरले. एका पदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलाखती घेऊन निवड करणे नियमबाह्य आहे. यामुळे लेखी परीक्षा घ्यावी. लेखी परीक्षेत पास झालेल्यांना प्रात्यक्षिक मुलाखतीसाठी बोलावण्यात यावे. जेणेकरून उमेदवारी निवडीत पारदर्शकता दिसून येईल, असे खूप लढलो बेकीने आता लढूया एकीने या संघटनेचे संयोजक अतुल खोब्रागडे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

Latest Marathi News Live Update : राज्यभर आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

Sakal Podcast: नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा ते हरियाणात बहुमत चाचणीची मागणी

Loksabha Election : विकासासाठी हवे नरेंद्र मोदींचे नेतृत्व ;बाणेर, पर्वतीमधील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

आजचे राशिभविष्य - 10 मे 2024

SCROLL FOR NEXT