Nagpur Municipal Corporation 
नागपूर

Nagpur : ७५ हेल्थपोस्टचा प्रकल्प गुंडाळण्याचा डाव

प्रशासक नियुक्तीनंतर दुर्लक्ष; १२ ‘स्ट्रक्चर’ धुळखात

राजेश प्रायकर

नागपूर : माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्षानिमित्त घोषणा केलेल्या ७५ हेल्थपोस्टचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रशासक नियुक्तीनंतर गुंडाळण्यात आल्याची चिन्हे आहेत.

सामाजिक संस्थांच्या मदतीने नागरिकांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या प्रकल्पांतर्गत लाखांचा खर्च करून १२ हेल्थपोस्टचे स्ट्रक्चर तयार करण्यात आले. परंतु आता हे स्ट्रक्चर धुळखात पडले असल्याने प्रकल्पच इतिहास जमा करण्याचा प्रयत्न असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रशासनाची उदासिनताही अधोरेखित झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘आझादी-७५’ अंतर्गत शहराच्या विविध भागांत ७५ वंदे मातरम् हेल्थ पोस्ट तयार करण्याची घोषणा तत्कालीन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली होती. विशेष म्हणजे हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता.

शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये प्राथमिक आरोग्याची सुविधेसाठी वंदे मातरम् हेल्थ पोस्ट तयार करून नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा अगदी नाममात्र १० रुपये शुल्क घेऊन द्यावी अशी या प्रकल्पामागील संकल्पना होती. वंदे मातरम् हेल्थ पोस्टच्या संचालनासाठी सामाजिक संस्था व महापालिका संयुक्तपणे काम करणार होते, अशा पद्धतीने या प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. महापौरपदी असताना दयाशंकर तिवारी यांनी विविध सामाजिक संस्थांसोबत बैठकही घेतली होती.

झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गरीब जनतेला त्यांच्याच परिसरात प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस होता. सुरुवातीला तीन ते चार हेल्थपोस्ट सुरूही झाले. परंतु महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती झाली अन् या प्रकल्पाचा वेग मंदावला.

मुळात प्रशासक नियुक्तीनंतर या प्रकल्पाला वेग येणे अपेक्षित होते. महापालिकेने जागा व इन्फ्रास्ट्रक्चर देणे व सामाजिक संस्थांनी आरोग्य सेवा देणे, अशी संकल्पना होती. ५५ सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे काही ठिकाणी कंटेनरप्रमाणे स्ट्रक्चर तयार करण्यात आले.

एकूण १२ स्ट्रक्चर तयार करण्यात आले असून त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आला. परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थांना जागा देण्याच्या मुद्द्यावरून हा प्रकल्पच रोखून धरल्याचे सुत्राने नमुद केले. हा प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

डझनभर संस्थांचे अर्ज

या प्रकल्पासाठी शहरातील सामाजिक संस्थांनीही उत्सुकता दाखवली होती. एकूण १२ संस्थांचे अर्ज आले. यातील पाच संस्थामार्फत हेल्थपोस्ट सुरू आहे तर दोन हेल्थपोस्ट येत्या काही दिवसांत सुरू होईल. इतर संस्थांबाबत अद्याप तरी कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सुत्राने नमुद केले.

दोन विभागामध्ये मतभेद

सामाजिक संस्थांनी या प्रकल्पात रस दाखवला. परंतु जागा देताना सामाजिक संस्थांसोबत आरोग्य विभाग की स्थावर विभाग, यापैकी कुणी करार करावा, यावरून प्रकल्पाचा वेग मंदावला. आरोग्य विभाग व स्थावर विभागात यांच्यात जागा देण्याबाबत मतभेद असल्याने प्रकल्पाला भविष्यच नसल्याचे समजते.

दोन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये गैरसमज होते. परंतु महापालिकेची जागा केवळ हेल्थपोस्ट संचालनासाठी द्यायची आहे, हे आता स्पष्ट करण्यात आले. कराराबाबतही काही मतभेद होते. तेही दूर करण्यात आले. येत्या काही दिवसांत चार हेल्थपोस्ट सुरू होईल तसेच संपूर्ण ७५ हेल्थ पोस्टही सुरू होतील.

- दयाशंकर तिवारी, माजी महापौर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Merger: पडद्यामागे मोठ्या घडामोडी! सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन?, पुण्यात पार्थ पवारांनी बोलावली तातडीची बैठक

India Inflation Rate: दुष्काळाबरोबरच महागाईचाही चटका; दर सहा टक्क्यांवर, व्याज दरवाढीची शक्यता

IND vs NZ 4th ODI Live: रोहित शर्माची 'चूक' महागात पडली! विल यंगचे शतक अन् न्यूझीलंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य

Balochistan Blast : पाकिस्तानात पुन्हा पुलवामा सारखा आत्मघाती हल्ला; बलुचिस्तानमध्ये ५ सुरक्षा जवानांसह ८ जणांचा मृत्यू

'VFX कौतुक पुरे! अभिनय कधी करणार?' करण जोहरचा बॉलिवूड कलाकारांना टोला; 'रामायण'च्या चर्चेदरम्यान वक्तव्य व्हायरल

SCROLL FOR NEXT