Fraud  esakal
नागपूर

नागपूर : बनावट कागदपत्राद्वारे जामीन घेणारे ८२ जण पोलिसांच्या रडारवर

पोलिसांकडून अटकेची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आरोपीला जामिन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करुन देणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने पर्दाफाश केला. या प्रकरणाची पाळेमुळे बरीच खोलवर असून त्या माध्यमातून जामीन मिळविणाऱ्या ८२ जणांची माहिती पोलिसांनी गोळा केली असून त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सुनील मनोहर सोनकुसरे (वय ४५ रा.देशपांडे ले-आऊट, वर्धमाननगर), सतीश रामकुमार शाहू (वय ३२ रा.देशपांडे ले-आऊट, वर्धमाननगर), रवी सावरकर आणि आरती शाहू हे चौघेही न्यायालय परिसरात आरोपीला जामीन मिळावा बोगस आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र, बनावट घर-कर पावत्या, एक कार, बनावट सरकारी शिक्क्यांच्या माध्यमातून चक्क न्यायालयासमोर एका व्हॅनमध्ये बसून अर्ध्या तासात प्रमाणपत्र तयार करुन देण्याचे काम करीत असत.

यासाठी न्यायालयीन प्रक्रियेतूनच आरोपी त्यांच्याकडे निश्‍चिंत होऊन येत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर असून त्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. सुनील आणि सतीश यांच्या कॉल डिटेल्समधून संबंधित असलेले जमानतदार, आरोपी आणि त्यांच्या संपर्कातील विविध अशा ९० लोकांची माहिती मिळाली. त्यातून तपासात ८२ लोक जणांना जामीन मिळाला असून काही मोक्काचेही आरोपी असल्याची माहिती आहे.

त्यामुळे पोलिसांनी त्यांची ओळखही पटवली. आता त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. गुन्हे दाखल होताच त्यांचे अटकसत्र सुरू होतील. तसेच मोक्कातील आरोपीचा जामीन रद्द करण्याची प्रक्रियाही पोलिसांनी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT