nagpur university  sakal
नागपूर

नागपूर : विद्यार्थी संसदेच्या समित्यांमध्ये अभाविप, भाजयुमोचे पदाधिकारी

मंगेश गोमासे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वाढीस लागावे यासाठी विद्यार्थी संसदचे आयोजन २६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान केले आहे. मात्र, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांवर केवळ अभाविप आणि भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. नेमक्या कुणाच्या इशाऱ्यावरून या सर्व पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली आहे.

विद्यार्थी संसदेसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत नामांकन दाखल करायचे आहे. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. २१ तारखेला भंडारा व गोंदिया, २२ रोजी वर्धा व नागपूर ग्रामीण तर २३ तारखेला नागपूर शहरातील विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. २६ तारखेपासून नागपूर महानगरपालिकेच्या महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवनात विद्यार्थी संसदचे आयोजन केले जाणार असून ते ४ दिवस ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

त्याच्या नोंदणी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी भाजयुमोच्या युवती प्रमुख डॉ. डिम्पी बजाज यांच्याकडे आहे. वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी अभाविपचा कार्यकर्ता वैभव बावनकर याच्याकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बावनकर याच्यावर आंदोलनादरम्यान विद्यापीठामध्ये तोडफोड केल्याची पोलिस तक्रारही आहे. याशिवाय समितीमध्ये अभाविप वा भाजयुमोचे अन्य पदाधिकारी आहेत. यापूर्वी अशाप्रकारे तयार होणाऱ्या समित्यांमध्ये कधीही पक्षपात करण्यात आला नाही. मात्र, यावेळी इतर सिनेट सदस्यांना डावलून केवळ स्वतःच्या मताप्रमाणे सदस्यांची निवड केल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

विषयाचीही गुप्तता

एका विशिष्ट विचारधारेचे समर्थन असणारा आणि विशिष्ट अजेंड्यावर हा विषय ठेवला जाणार असल्याने विद्यापीठाकडून ‘विद्यार्थी संसद’च्या नावावर नेमक्या कुठल्या विचारांचा प्रचार करायचा आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. याशिवाय संसदेच्या दुसऱ्या दिवशी एक ठराव मांडण्यात येणार आहे. मात्र, या ठरावाचा विषय काय? यावर कुणीही माहिती द्यायला तयार नाही. केवळ वर्तमान परिस्थितीला धरून ठराव असल्याचे बोलले जात आहे. ठरावाच्या विषयासंदर्भात ठेवण्यात आलेली गुप्तता बघता कार्यक्रमाआधी वाद टाळता यावा म्हणून ठरावाच्या विषयासंदर्भात गुप्तता ठेवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शंभर वर्षांनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या ‘विद्यार्थी संसद’चा विषय चिघळण्याची शक्यता आहे.

समिती तयार नाही

विद्यार्थी संसदेच्या आयोजनातील समितीच्या सदस्यांची नावे अंतिम झालेली नाहीत. त्याबाबत कुलगुरू निर्णय घेणार आहेत असे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अभय मुदगल यांनी सांगितले. मात्र, कार्यक्रम दोन दिवसावर असताना अद्याप समिती तयार झालेली नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT