नागपूर

Nagpur Agriculture: गारपिटीमुळे कोट्यवधींच्या पिकांचा चुराडा, शेतकऱ्यांची मदतीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे लागलेल्या अवकाळीचा ससेमिरा सुटताना दिसत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur agriculture Loss due to Hail rain: कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे लागलेल्या अवकाळीचा ससेमिरा सुटताना दिसत नाही. रविवारी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून कोट्यवधींच्या पिकांचा शेतातच चुराडा झाला आहे.

नांद: भिवापूर तालुक्यातील नांद परिसरात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या शेतात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मिरची, ज्वारी पिके असून थोड्या दिवसांत पीक शेतकऱ्यांच्या हातात येणार होते. परंतु वादळी अवकाळी पावसामुळे ही पिके कोलमडून गेली.

काही प्रमाणात हरभऱ्याच्या कापणीला सुरूवातही झाली.बहुतेक शेतकऱ्यांचे कापणीला यायचेच आहे. तर काहींचे कापणीला आले, तर काहींची कापणी झाली. हरभऱ्याची कापणी झालेला हरभऱ्याचे ढिगारे शेतात पसरून आहेत.(Latest Marathi News)

पिके खराब होऊन उत्पादनात घट होणार आहे. तालुक्यातील नांद, बेसूर, चिखलापार, महालगाव, पांजरेपार, लोणारा, वणी, धामणगाव (ग.),आलेसूर,भगवानपूर,पोळगाव, खोलदोडा, झमकोली, उरकुडापार खापरी‌‌ या गावांना वादळी पावसाचा तडाखा बसला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. यापूर्वीच शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

अंबाडा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

अंबाडा, सावरगाव, मसोरा तसेच परिसरात गारा व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा,मोसंबी फळपिकांचे व तुर, गहू व हरभरा आदी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षीचा पावसाचा लहरीपणा, वाढलेले रासायनिक खते व औषधे यांचे भाव व बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे लागणारी अधिकची मजुरी द्यावी लागली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

Chhatrapati Sambhajinagar: पाच कोटी रोख, चार रायफल, दोन पिस्टल, सहा हजार काडतुसे! ; डाॅन बाबा फर्जनच्या घरात घबाड

Latest Marathi News Update : पुण्यातील सदाशिव पेठेत मध्यरात्री दुकानाला आग

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

SCROLL FOR NEXT