Nagpur news esakal
नागपूर

Nagpur Pollution : हवेची गुणवत्ता घसरण कायम, दिल्ली मुंबई पाठोपाठ नागपूरात प्रदूषणाचा धोका

शहरातील प्रदूषणाचा धोका कायम आहे

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शहरातील प्रदूषणाचा धोका कायम आहे. दिवाळीपूर्वी ‘समाधानकारक’वरून अत्यंत खराब श्रेणीत घसरलेली हवेची गुणवत्ता अजूनही तशीच आहे. त्यामुळे नागपूरकरांना प्रदूषित वातावरणाचा अनुभव येत आहे.

फटाक्यांमुळे ५० टक्के अतिरिक्त कार्बन उत्सर्जन लक्षात घेऊन हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांचा होता. परंतु शहर व परिसरात फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला व अपेक्षित मर्यादेपेक्षा प्रदूषणात अधिक वाढ झाल्याचे दिसून आले. एकूणच जिल्ह्याची स्थिती पाहिल्यास हवेची गुणवत्ता आता मध्यम श्रेणीत आहे. हवेच्या प्रदूषणातील प्रदूषकांना पाहता अतिसुक्ष्म धुलीकण (पीएम २.५) आणि सुक्ष्म धुलीकणांचे (पीएम १०) प्रमाण वाढले आहे.

चार दिवसांपासून मुख्य शहरातील हवेची गुणवत्ता खराब नोंदली जात आहे.

रामनगर परिसरात लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्थीच्या दिवशी हवेची गुणवत्ता १००० पेक्षा अधिक होती. आता मात्र, हवेची गुणवत्ता उत्तम नसली तरी चिंताजनक नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या भागातील अतिसुक्ष्म धुलीकणांचे प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यात हिवाळ्यात धुलीकण वाहून नेले जात नाहीत. प्रदूषणातील वाढ अशीच कायम असल्याने नागरिकांनीही आरोग्याची काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.

विविध भागांना फटका

शुक्रवारी (ता. १७) महाल, अंबाझरी, सिव्हिल लाइन्स परिसरात खराब हवेची गुणवत्ता नोंदविली. केवळ रामनगर येथील हवेची गुणवत्तेत थोडी सुधारणा झाली आहे. शहर परिसरात फटाक्यांमुळे अपेक्षित मर्यादेपेक्षा प्रदूषणात अधिक वाढ नोंदवण्यात आली.जिल्ह्याची हवेची गुणवत्ता आता मध्यम श्रेणीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT