Astro Night Tourism sakal
नागपूर

Nagpur : नागपुरात ‘ॲस्ट्रो नाईट टुरिझम’चा श्रीगणेशा

गोरेवाडा प्राणि संग्रहालय येथे आकाशदर्शन कार्यक्रम उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेमध्ये खगोल विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी भारतातील विविध शहरांत ‘ॲस्ट्रो नाईट टुरिझम’ या उपक्रमाची सुरवात केली आहे.

पर्यटनस्थळी आकाश दर्शनाचे कार्यक्रम होणार आहे. नागपूरमधील याची सुरवात रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडळतर्फे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातून झाली.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडळतर्फे गोरेवाडा प्राणिसंग्रहालय वाहनतळ येथे हौशी नागरिकांकरिता आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दोन हजाराहून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी यात सहभाग घेतला. उपस्थितांना रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडळ,

नागपूर येथील तज्ज्ञ चारुदत्त पुल्लीवार, महेंद्र वाघ आणि अभिमन्यू भेलावे यांनी मार्गदर्शन केले. एकूण सहा आकाश दुर्बिणीच्या सहाय्याने उपस्थितांनी चंद्रावरील खळे, मंगळ, शुक्र, ओरायन नेब्युला या खगोलांचा आस्वाद घेतला. केंद्रातर्फे सुमीत नासरे, तुषार मडके, हरिष देशपांडे, पुष्पम चौरासिया, कालिदास नाकाडे, पवन डोहाळे यांनी आकाश दुर्बीण सहायकाची भूमिका पार पाडली.

सामान्य नागरिकांमधील ग्रह, तारे, नक्षत्र याबद्दलचे गैरसमज दूर करून खगोल विज्ञानाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे महेंद्र वाघ यांनी सांगितले. प्राणिसंग्रहालयाचे संचालक एस. एस. भागवत यांनी सहभागी नागरिक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam Paper : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! प्रश्नपत्रिका आता फक्त ३-४ पानांचीच, मंडळाची १८ कोटींची बचतही होणार

ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

IPL 2026 फायनलनंतर मोठी घटना! गुजरात टायटन्सच्या बसला आग, वाचा नेमकं काय घडलं?

Shirdi: एसटी-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, ११ जखमी; लेकीच्या वाढदिवसाला निघालेल्या वडिलांसह काकावर काळाचा घाला

Latest Marathi News Update : विषारी दारु प्रकरणात १५ मृत्यू, सीआयडीची माहिती

SCROLL FOR NEXT