Nagpur Atrocities on five year old girl Pratapnagar police station case Filed Sakal
नागपूर

नागपूर : पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने पाच वर्षाच्या चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने पाच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. बॉबी प्रमोद जंगले (२५) असे आरोपीचे नाव आहे. शेजारी राहणाऱ्या आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला.

आरोपी बॉबी विकृत स्वभावाचा आहे. तो खासगी संस्थेत नोकरीला आहे. त्याची घराशेजारी राहणाऱ्या पीडित चिमुकलीवर वाईट नजर होती. मागील १५ एप्रिलला दुपारी १ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी घरासमोर अंगणात खेळत होती. बॉबीच्या घरीही कोणी नव्हते. दरम्यान बॉबीने पीडितेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरी बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

मुलगी भेदारलेल्या अवस्थेत घरी परतली. आईने विचारपूस केली, मात्र बॉबीच्या भीतीमुळे ती गप्पच राहिली. तेव्हापासून बॉबी जेव्हाही तिच्या समोर यायचा ती घाबरायची. आईला संशय आला. तिने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बॉबीचे कुकृत्य पुढे आले. आईने मुलीसह थेट प्रतापनगर पोलिस स्टेशन गाठून बॉबीविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी पोक्सो व अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून बॉबीला अटक केली. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT