नितीन गडकरी  sakal
नागपूर

आयुर्वेदिक औषधे स्वस्त करण्याची गरज : नितीन गडकरी

आयुर्वेदाचा प्रचार करताना ही औषधे कमीत कमी किंमतीत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आयुर्वेद व योगविज्ञान ही भारतीय संस्कृतीची ताकद असून भारताला विश्वगुरु बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतिहास, संस्कृती व परंपराही महत्त्वाची आहे. आयुर्वेद, योगविज्ञान व आध्यात्मिक विचारदर्शनही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आज आयुर्वेदिक औषधे अत्यंत महाग आहेत. आयुर्वेदाचा प्रचार करताना ही औषधे कमीत कमी किंमतीत उपलब्ध करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे रेशिमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयुर्वेदावर रविवारी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमाला आनंदनाथ महाराज, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, रणजित पुराणिक, राकेश शर्मा, आशुतोष गुप्ता, निरंजनदास, जयंत देवपुजारी, चरणसिंग ठाकूर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, शिक्षणाच्या आधारावर मूल्याधिष्ठित शिक्षण व परिवार पद्धती महत्त्वाची आहे. आयुर्वेद ही मोठी विचारधारा व विज्ञान आहे. आयुर्वेद योग्यप्रकारे जगासमोर मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. या सादरीकरणातून यश मिळाले तर आपण विश्‍वगुरु होऊ शकतो. जागतिक स्तरावर ही बाब कशी मांडायची याची एक पद्धती आहे.

आपला विचार श्रेष्ठ असला तरी त्याचे सादरीकरण करताना जगाला ज्या माध्यमातून, ज्या भाषेतून पाहिजे आहे, तसे मांडले तरच आपण यशस्वी होऊ, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शिक्षण क्षेत्रासोबत सामाजिक सेवा क्षेत्रातही अनेक संस्था चांगले काम करीत आहेत. सामाजिक जाणीवेच्या भावनेतून अशा संस्थांना मदत करणे आवश्यक आहे.

मी आयुर्वेदाचा समर्थक आहे. पण आयुर्वेदाचा विकास करीत असताना त्यावर संशोधन करणे आवश्यक आहे. आमचे सरकार आल्यानंतर आयुष्य मंत्रालयाची स्थापना झाली. आता आयुर्वेदाला प्रोत्साहन मिळते व त्याचा प्रचारही होतोय. आयुर्वेद डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करणार नाही, अशी एक प्रतिज्ञा करावी. आयुर्वेदात अनेक चांगली, परिणामकारक औषधे आहेत. पण शॉर्टकट मारणारे लोक आयुर्वेदाचे नुकसान करीत आहेत, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT