high court Esakal
नागपूर

तबलिगी जमातीतील नागरिकांविरोधातील गुन्हे उच्च न्यायालयाकडून रद्द

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तबलिगी जमातीमधील १२ नागरिकांविरुद्ध बुलडाणा पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि दोषारोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केले. दाखल गुन्हे व दोषारोपपत्र रद्द करावे, या विनंतीसह जमातीतील कामठी (जि. नागपूर) येथील ११ व बुलडाणा येथील एका नागरिकाने संयुक्त फौजदारी अर्ज दाखल केला होता.

यावर न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. अर्जानुसार, बुलडाणा येथील हुसैनिया मरकज मशिदमधील नागरिकांविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी कारवाई करीत कोरोना चाचणी केली. यामध्ये, सर्व आरोपींची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे आरोप ठेवत बुलडाणा पोलिस ठाण्याने साथ रोग व आपत्ती नियंत्रण कायद्यांतर्गत १२ नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

दुसऱ्यांदा कोरोना चाचणी केली असता ११ पैकी ३ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आले व शहरामध्ये जमावबंदी असताना शासनाच्या परवानगी शिवाय मशिदीमध्ये नागरिक जमल्याचे आरोप पोलिस प्रशासनाने केले. याबाबत पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान हे नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. तसेच, नागपूर खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या आदेशाचे दाखले युक्तिवाद दरम्यान देण्यात आले. सर्व बाजू लक्षात घेता उच्च न्यायालयाने दाखल गुन्हे आणि दोषारोपपत्र रद्द केले. अर्जदारांतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: भिवंडी घटनेत जीव वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्यांनी घेतला बळी, ठाण्यात मृत्यू

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला! दरवाजे 4 फुटांवर, कोयना नदीत 24 हजार 908 क्युसेक पाणी; कराडसह कृष्णाकाठ सतर्क

Chopdai Devi Yatra : जोतिबा भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! डोंगरावर 'या' दिवशी आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा; प्रशासनाकडून तयारी सुरू

Latest Marathi News Live Update : प्रशांत किशोर यांची भक्कम आघाडी; 3 पैकी 2 जागांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता

Friend Bonding Numerology: 'या' ३ जन्मतारखांचे लोक बनतात बेस्ट फ्रेंड! भांडण झाले तरी तुटत नाही मैत्रीचे नाते...

SCROLL FOR NEXT