नागपूर

आमदार सावकारांविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कामठी विधानसभा मतदार संघातील (Kamptee assembly constituion) आमदार टेकचंद सावरकर (MLA Tekchand Sawarkar) यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. सादूकर हटवार यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

याप्रकरणी न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, २०१९ साली पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान, टेकचंद सावरकर यांनी नामांकन अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रामध्ये घरातील लोकांची नावे, संपत्ती, देयके, बँकेचे खाते क्रमांक, तारण असलेली संपत्ती व त्यांच्यावर असलेले एकूण कर्ज याची माहिती लपवून ठेवली होती. तसेच, निवडणूक अधिकार्‍यांनीही सावरकरांचा नामांकन अर्ज स्विकारतांना योग्य प्रक्रिया पार पाडली नाही, असा दावा करीत हटवार यांनी सावरकरांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते.

तसेच, त्यांची निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी व कामठी मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असेही याचिकाकर्त्याच्या म्हणणे होते. सुनावणी दरम्यान, याचिकाकर्त्याने मांडलेले मुद्दे न्यायालयाचे समाधान करू शकले नाही. त्यामुळे, न्यायालयाने ही याचिका गुणवत्ताहीन ठरवत नागरी प्रक्रिया कायदा आदेश 7 कलम 11(अ) अन्वये फेटाळून लावली. तसेच, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना पंधरा दिवसांमध्ये या आदेशाची प्रत पाठवावी असे आदेश न्यायालयाने रजिस्ट्रीला दिले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आर. एम. भांगडे, आ. सावरकर यांच्यातर्फे अ‍ॅड. एच. डी. डांगरे यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

Amboli Monsoon Tourism : पावसाळ्यात आंबोली फिरायचा प्लॅन आहे? वन विभागाची 'निसर्गरम्य सफारी' पुन्हा सुरू; वाचा कधीपासून आणि कसं करायचं बुकिंग!

FDA Pune Satara Action: तुमच्या ताटात पनीरऐवजी 'चीज ॲनालॉग'? पुणे साताऱ्यात FDAची कारवाई, धक्कादायक माहिती समोर..

SCROLL FOR NEXT