Nagpur  Esakal
नागपूर

Bhandara-Gondiya Loksabha: भंडारा-गोंदिया मतदारसंघात मतपत्रिकेवर २५ वर्षांनंतर दिसणार पंजा, 'या' ३ पक्षांत तिरंगी लढत

भंडारा लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमधील असंतुष्ट संजय कुंभलकर यांनी बंडखोरी करत बहुजन समाज पक्षाची उमेदवारी मिळवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Congress on Bhandara Gondiya Constituency Loksabha: भंडारा लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमधील असंतुष्ट संजय कुंभलकर यांनी बंडखोरी करत बहुजन समाज पक्षाची उमेदवारी मिळवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथून उभे रहावे, असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता.

तो आग्रह बाजूला सारून पटोलेंनी डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मेंढे, कुंभलकर व पडोळे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकीत भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. यावेळी २५ वर्षांनंतर काँग्रेसचा पंजा हे चिन्ह मतदारांना दिसणार आहे.

भाजपचे सुनील मेंढे हे व्यवसायाने मोठे कंत्राटदार आहेत. ते यापूर्वी भंडारा शहराचे नगराध्यक्ष होते. मात्र, त्यांच्यावर भाजपचा एक गट नाराज असल्याचे सांगितले जाते. यातही माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे हे राजकारणात नवीन आहेत.

ते व्यवसायाने डॉक्टर आहे. मात्र, त्यांचे वडील (कै.) यादवराव पडोळे हे एकेकाळी जिल्हा दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे सहकार चळवळ व राजकारणात डॉ. पडोळे यांचा वावर आहे. याच आधारावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना काँग्रेसची उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे.

भाजपमधील माजी नगरसेवक संजय कुंभलकर यांनी भाजपचा राजीनामा देऊन बसपची उमेदवारी मिळावली आहे. कुंभलकर यांच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. ते उमेदवारी कायम ठेवणार असून त्यांच्यामुळे या मतदारसंघातील भाजपच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच वंचित आघाडी व इतर प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवार त्यांच्या भागातील काही मते घेण्याची शक्यता आहे

पोवार समाजाची मते निर्णायक

अशा परिस्थितीत बहुसंख्य असलेल्या पोवार समाजाची मते कुणाकडे जातील? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. हा समाज भाजपचा पारंपरिक मतदार असून यापूर्वी चुन्नीलाल ठाकूर व शिशुपाल पटले यांनी याच मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून या समाजावर अन्याय होत असल्याची भावना समाजबांधवांत आहे. त्यामुळे या समाजाची मते ज्याला मिळतील, तोच विजयाचा मानकरी ठरेल, असे साधे समीकरण आहे.

जात-पोटजातीचे राजकारण

भंडारा-गोंदिया मतदारसंघात सर्वाधिक लोकसंख्या असलेले कुणबी, तेली, पोवार या समाजाची मते लक्षात घेऊन राजकीय पक्ष उमेदवारी देतात. यावरूनच संबंधित उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता ठरविली जाते. मागील काही निवडणुकींमध्ये कुणबी समाजाचा उमेदवार हमखास निवडून येत आहे. त्यामुळेच भाजप व काँग्रेसकडून दिले गेलेले उमेदवार हे कुणबी समाजाचे आहेत. पडोळे व मेंढे यांच्या पोटजाती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे कुणबी मतात यंदा पोटजातीचे राजकारण चालेल, असे दिसते. तेली समाजाची मतेसुद्धा कुणबी समाजाच्या खालोखाल आहे. मागील अनेक निवडणुकीत तेली समाजाला दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रतिनिधीत्व दिले नाही. कुंभलकर हे त्यांच्यासाठी पर्याय झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gavai : संघाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं, पण पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा; कमलताई गवई यांनी नेमकं काय म्हटलं?

FASTag नसल्यास १०० रुपयांऐवजी UPIने १२५ तर रोख २०० रुपये; टोलबाबत नवे नियम

Latest Marathi News Live Update : दोन दिवस पोलिसांची निलेश घायवळाच्या पुण्यातील घरांवर छापेमारी; बंदुकीच्या गोळ्या, जमिनींची कागदपत्रे सापडली

माेठी बातमी! 'पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण भोवणार'; नेमके काेणत्या शेतकऱ्यांचे सरकारी लाभ बंद होण्याची शक्यता..

Vidarbha Tigers: सह्याद्रीत घुमणार विदर्भातील वाघांची डरकाळी! स्थानांतरणास हिरवा कंदील, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT