दत्तात्रय भरणे esakal
नागपूर

नागपूर : भरणेंनी घेतला अधिवेशनाच्या तयारीचा आढावा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपुरात ७ डिसेंबरपासून होणाऱ्या नागपूर अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाने पूर्व तयारीसाठी घेतलेल्या आघाडीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

कोरोना सावटामध्ये नागपूर येथे ७ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन प्रस्तावित आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील तयारी सुरू केली आहे. यापूर्वी विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑक्टोबरला बैठक झाली होती. त्यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यानंतर आज राज्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर., अतिरिक्त विभागीय आयुक्त संजय ढिवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकार, यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

अधिवेशनासंदर्भात अधिकृत घोषणा मुंबई येथे होणार आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या कामकाजाची वस्तुस्थिती त्यांनी जाणून घेतली. विधान भवन, विधान भवनाबाहेर परिसर, आमदार निवास, रविभवन, १६० खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार निवास या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, दूरध्वनी व्यवस्था, वाहन व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा, अहोरात्र वैद्यकीय सुविधा, नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन दलाची उपलब्धता, विनाअडथळा इंटरनेट, वाय-फाय सुविधा, रेल्वे आरक्षण, खानपान व्यवस्था, अन्नपदार्थ व पेय यांची तपासणी ,उत्तम स्वच्छता या संदर्भात त्यांनी आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल होणार? उच्चस्तरीय टास्क फोर्सची स्थापना; PM मोदींची मोठी घोषणा

Madha Vitthal Temple : परतीच्या वारीत माढ्यातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी; दर्शनासाठी रांगा

Career Katta Paliwala College : पालीवाला महाविद्यालयात करिअर संसद शपथविधी उत्साहात; विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला नवी दिशा

IND vs ZIM: पहिलाच बॉल अन् वैभव सूर्यवंशीचा भारी झेल, गोलंदाज मयंक यादवची भुवनेश्वर कुमारच्या रेकॉर्डशी बरोबरी; पाहा Video

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

SCROLL FOR NEXT