Nagpur  Esakal
नागपूर

Nagpur: भाजयुमोच्या संमेलनसाठी आमदारांना प्रत्येकी १५०० युवकांचे टार्गेट, नागपूर विद्यापीठात पार पडणार कार्यक्रम

भारतीय जनता युवा मोर्चाच्या नमो राष्ट्रीय संमेलनासाठी विदर्भातील प्रत्येक आमदाराला पंधराशे युवकांना आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur BJYM Summit: भारतीय जनता युवा मोर्चाच्या नमो राष्ट्रीय संमेलनासाठी विदर्भातील प्रत्येक आमदाराला पंधराशे युवकांना आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या संमेलनात एक लाख युवक सहभागी होणार असल्याचा दावा भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.

नागपूर विद्यापीठाच्या रविनगर येथील पटांगणावर सोमवारी (ता.४) युवा संमेलन होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे सर्वच बडे नेते या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांच्या कार्यकाळात युवकांसाठी जाहीर केलेल्या योजना आणि आगामी कार्यकाळासाठी युवकांचे मत या संमेलनाच्या माध्यमातून जाणून घेण्यात येणार आहे. याकरिता सुमारे एक लाख युवांना आमंत्रित करण्यात आले आहे. भाजयुमोचे पदाधिकारी अनेक महाविद्यालयांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. (Latest Marathi News)

शनिवारी या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भातील भाजपचे सर्व जिल्हा व शहराध्यक्षांची बैठक लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोका येथे घेण्यात आली. यात कोणी किती युवकांना आणायचे याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भाजपच्या आमदारांना प्रत्येकी १५००, एका बुथवरून १० युवकांना आणण्याची जबाबदारी भाजपच्या सर्व संघटनांवर देण्यात आली आहे. नागपूर शहरात २०८८ बुथ आहेत. नागपूर आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना एक बुथ दहा युथ असे टार्गेट देण्यात आले असल्याचे कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: मुलाने दिला लढा, सरकार झुकलं; आईच्या एका वाक्याने अनेकांचे डोळे पाणावले... दिपकेंच्या गावात जल्लोष! Video Viral

IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral

Pune Crime: पोलिस चौकीत सुरू होता 20 लाखांचा डाव? नऱ्हे दरोड्याचं रहस्य उलगडलं; २ पोलिस अन् तोतया पत्रकार जाळ्यात, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

Latest Marathi News Update : अंधभक्ताविरोधात देशभक्त जिंकले, मोदीजी आतातरी देशाकडं लक्ष द्या : उद्धव ठाकरे

ED Action: मुंबईत ईडीची मोठी कारवाई! रंगशारदा हॉटेलसह ३३२ कोटींच्या मालमत्ता जप्त, भूखंडाचाही समावेश

SCROLL FOR NEXT