Accident Sakal
नागपूर

Nagpur : कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव स्कॉर्पियो कारने (क्रमांक एम२९- ७२६६) जबर धडक दिली.

सकाळ वृत्तसेवा

वणी - तालुक्यातील राजूर या आपल्या गावी दुचाकीने परतत असलेल्या दुचाकीस्वारांना कारने जबर धडक दिली. त्यात दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. त्यातील एका गंभीर तरुणाचा चंद्रपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना मार्गावरील साई मंदिराजवळ रविवारी (ता.२३) रात्री नऊच्या सुमारास घडली.

आकाश रतन गाडेकर (वय २६) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकी चालवीत असलेला रंजित हिरामण खोब्रागडे (वय २८) हा किरकोळ जखमी झाला आहे. ते दोघेही राजूर कॉलनी येथील रहिवासी आहेत. रविवारी वणी येथील आपले काम आटोपून ते दोघे दुचाकीने (क्रमांक एमएच २९-७०७३) आपल्या गावी परतत होते.

त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव स्कॉर्पियो कारने (क्रमांक एम२९- ७२६६) जबर धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेला तरुण आकाश हा गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले.

मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूरला हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर कारसह चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी याबाबत कारचालक अनिल धर्माजी भोयर (वय ४७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT