Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: युवतींना टॉन्ट मारल्याने युवकाची केली हत्या, दोन युवतींना अटक, हुडकेश्‍वरमधील घटना, परिसरात खळबळ

हुडकेश्‍वर पोलिस हद्दीतील महालक्ष्मीनगर येथे युवतीला टॉन्ट मारल्याने झालेल्या किरकोळ वादातून दोघांनी येऊन चाकूने सपासप वार करून खून केला. ही घटना रात्री अकरा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime: हुडकेश्‍वर पोलिस हद्दीतील महालक्ष्मीनगर येथे युवतीला टॉन्ट मारल्याने झालेल्या किरकोळ वादातून दोघांनी येऊन चाकूने सपासप वार करून खून केला. ही घटना रात्री अकरा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन युवतीसह युवकाला अटक केली.

रणजित बाबूराव राठोड (वय २८, रा. ज्ञानेश्‍वरनगर) असे मृताचे नाव आहे. आकाश दिनेश राऊत (वय २५, रा.हसनबाग), जयश्री दीपक पानझाडे (वय २४) व सविता सायरे (वय २४, दोन्ही रा.वाडी) अशी आरोपींची नावे आहेत. रणजित हा कपडे विकत असून त्याचे किराणा दुकानही आहे. त्याचे लग्न झाले असून पत्नी आणि चार मुली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्‍वरमधील महालक्ष्मीनगर चौकात पानठेल्यावर रणजित सिगारेट ओढत होता.

यादरम्यान दोन पंचविस ते तीस वयोगटातील दोन युवती पानठेल्यावर आल्या. रणजितने त्यांना टॉन्ट मारला. त्यामुळे त्यांचे रणजीतला हटकले. त्यातून युवती आणि रणजीतमध्ये वादास सुरुवात झाली. रणजीतने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे दोन्ही युवतींनी आकाशला फोन करून माहिती दिली. काही वेळातच, आकाश आणि त्याचा साथीदार तेथे आले.(Latest Marathi News)

तोवर रणजित पानठेल्यावरून निघून महालक्ष्मीनगरातील बाकडे सभागृहामागे गल्लीकडे निघाला. दोन्ही युवकांनी त्याचा पाठलाग करीत, त्याला मारहाण केली. एकाने चाकू काढून रणजितच्या छातीवर, पोटावर आणि मानेवर वार करीत, त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि पसार झाले.

अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना मिळताच, कैलास देशमाने ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करीत मृतदेह मेडिकल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी शंकर मोहन रॉय (वय ४७, रा. डवरे ले-आऊट, ज्ञानेश्‍वरनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल केला. यावेळी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असून आरोपींची ओळख पटवित, दोन्ही युवती आणि एका आरोपीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

मुली होत्या नशेत

पान ठेल्यावर सिगारेट घेण्यासाठी आलेल्या दोन युवती मद्यपान करून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मद्याच्या नशेत त्यांनी रणजितशी भांडण केले आणि त्याबाबत त्यांच्या दोन मित्रांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT