Nagpur news esakal
नागपूर

Nagpur : नागपुरातील मुलगा सापडला अमरावतीत

अचानक मुलगा तीन तासात अमरावतीकडे कसा गेला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दुकानातून स्टेशनरी आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलगा नाट्यमयरित्या काही तासातच अमरावती रेल्वेस्टेशन जवळ सापडल्याने खळबळ उडाली. सध्या तो पोलिस ठाण्यात असून तो तिथे कसा पोहचला? याबाबत विचारणा सुरू आहे. मात्र, त्याने अद्याप माहिती न दिल्याने गुढ कायम आहे.

इतवारी परिसरात एक कोळसा व्यापाऱ्याचा पुतण्या परिरातील दुकानातून स्टेशनरीचे साहित्य आणण्यासाठी सायंकाळी ५च्या सुमारास घरातून निघाला. तो दुकानात गेला. तिथून त्याने स्टेशनरीचे साहित्य घेतले. परत येत असताना, तो घरी न आल्याने कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी त्याची शोधाशोध केली. मात्र, न सापडल्याने लकडगंज पोलिसांत तक्रार नोंदविली. रात्री उशिरा पोलिस शोध घेत असताना, तो अमरावती येथील स्टेशनवर असल्याचे समजले.

पोलिसांचे पथक पाठवून त्याला शुक्रवारी सकाळी परत आणण्यात आले. त्याला सकाळपासूनच विचारणा करण्यात येत असताना, तो केवळ माहिती नसल्याचे सांगत आहे. मात्र, अचानक मुलगा तीन तासात अमरावतीकडे कसा गेला? हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरित असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Plastic Waste Drive: उरुळी कांचनमध्ये ‘माझे प्लास्टिक – माझी जबाबदारी’ संकल्पनेतून प्लास्टिक बँक; १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना साखर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

IND vs AFG, ODI: रोहित शर्मा रनआऊट झाल्यानंतर नक्की काय म्हणाला? शुभमन गिलनेच केला खुलासा

Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT