Nagpur Sakal
नागपूर

Nagpur : रुग्णांना शुद्धीत ठेवूनच काढली मेंदूतील गाठ; ब्रेन ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया कशी झाली ?

नागपूर येथील मिथिलेश आणि मध्यप्रदेशातील रहिवासी असलेल्या रेखा यांना डोक्यात तीव्र वेदना होत होत्या

सकाळ वृत्तसेवा

Nagpur - सुपरच्या मेंदूरोग उपचार विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेदरम्यान चक्क शुद्धीवर ठेवून त्यांच्या मेंदूतील ‘ट्यूमर’ (गाठ) काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले. यात दोन रुग्णांना जीवनदान मिळाले. ठणठणीत बरे होऊन ते घरी परतले.

सुपर स्पेशालिटीतील मेंदूरोग विभागात ४ कोटी खर्चून मेंदूरोग उपचार विभागात अत्याधुनिक मॉड्युलर ओटी तयार केली आहे. याच शस्त्रक्रियागारात अवघ्या विशीतील मिथिलेश गौतम आणि तिशीतील रेखा झंजाळ या दोन रुग्णांना शुद्धीत ठेवत त्यांच्या मेंदूतील ट्यूमर काढला.

नागपूर येथील मिथिलेश आणि मध्यप्रदेशातील रहिवासी असलेल्या रेखा यांना डोक्यात तीव्र वेदना होत होत्या. नातेवाइकांनी तपासणीसाठी खासगीत नेले. परंतु उपचार परवडणारे नसल्याने अखेर सुपरच्या बाह्यरुग्ण विभागात आणले. मेंदूतील गाठीमुळे दोघांनाही बोलता येत नव्हते.

सुपरमधील सहयोगी प्राध्यापक डॉ. संजोग गजभिये यांनी चाचण्या केल्या. मेंदूत डाव्या बाजूला ट्यूमर असल्याचे निदान झाले. ही शस्त्रक्रिया करताना डाव्या भागातील मेंदू पेशींना इजा होण्याची मोठी जोखीम होती. पण डॉ. प्रमोद गिरी यांच्या मार्गदर्शनात डॉ. गजभिये यांनी केवळ ट्यूमर असलेला भाग बधिर करून गाठ काढली.

डॉ. प्रमोद गिरी यांच्या नेतृत्वाखाली न्यूरोसर्जन डॉ. संजोग गजभिये, सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीकांत कालबगवार, न्यूरो भूलतज्ज्ञ डॉ. शिल्पा जैस्वाल, डॉ. पंकज भोपळे, डॉ. मंगेश मुळावकर, डॉ. कमलेश रंगारी, डॉ. पीयुष ठोंबरे यांच्या वैद्यकीय पथकाने मेंदूतील ट्यूमर ‘अवेक क्रिनिऑटॉमी’ची शस्त्रक्रिया यशस्वी केली.

दोन्ही रुग्णांना ब्रेन ट्यूमर होते. जोखमीची शस्त्रक्रिया होती. इजा झाली असती तर दोघेही बोलण्याची क्षमता गमावून बसले असते. केवळ शस्त्रक्रियेसाठी आवश्यक भाग बधिर केला आणि या रुग्णांवर शल्यक्रिया केली. याला वैद्यकीय भाषेत ‘अवेक क्रिनिऑटॉमी’ असे संबोधले जाते.

- डॉ. संजोग गजभिये, मेंदूरोग सर्जन, सुपर स्पेशालिटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT