Nagpur Broken road Dug pits Citizen headache sakal
नागपूर

नागपूर : एकदा नव्हे, चक्क तीनदा फोडले रस्ते

जलवाहिनीसाठी खोदलेले खड्डे एक वर्षानंतरही कायम; नागरिकांची डोकेदुखी

अशोक डाहाके

केळवद : सावनेर तालुक्यातील महत्वाचे आणि पंधरा हजाराच्या घरात लोकसंख्या असणाऱ्या केळवद गावातील मुख्य रस्ता बघितला तर पाणंद रस्त्यापेक्षाही बिकट अशी अवस्था येथील मुख्यरस्त्याची झालेली आहे.

मागील वर्षा फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत येथे घरोघरी नळाद्वारे पाणी देतो म्हणून स्थानिक ग्रामपंचायतीने गावातील मुख्य रस्त्यासह पाचही वार्डातील गुळगुळीत सिमेंट रस्ते वारवांर एक नव्हे चक्क तीनदा फोडत गावातील मुख्य रस्त्यासह इतरही सर्व रस्त्यांची चाळणी करुन टाकली. गावातील सर्व घरी नळाचे पाणी पोचलेच नाही. उलट रस्ता खोदल्याने मुख्य रस्त्यासह गावातील इतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

यामुळे रोज छोटे-मोठे अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांकडून सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांकडे रस्त्यावरील खड्ड्याबाबत तक्रार देऊनसुद्धा मागील एक वर्षापासून कुठलीच ठोस कार्यवाही ग्रामपंचायतकडून झालेली नाही. यामुळे गावात ग्रामपंचायत प्रशासन आहे की नाही, असे म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आलेली आहे.

मुख्यमंत्री पेयजेल योजनेंतंर्गत ‘घर तेथे नळ’ हे ब्रिदवाक्य समोर ठेऊन ग्रामपंचायतीने फेब्रुवारी २०२१ ला गावातील सर्वच भागातील प्रत्येक घरी नळ देण्यासाठी, गावातील मुख्य रस्त्यासह इतरही सर्वच सिंमेट रस्ते ग्रामपंचायतीने खोदून ते व्यवस्थित बुजवले नाही. उलट पावसाचे पाणी यावरुन गेल्याने खोदलेल्या रस्त्यावरील खड्डे मोठे होत गेले. यामुळे रस्त्यावरुन पायी जाणारे असो की वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन खोदलेल्या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे.

रस्ते दुरुस्तीसाठी कोणताच निधी नाही का?

मागील एक वर्षापासून रस्ते खोदून ‘जैसे थे’ आहे. मुख्य रस्त्यासह गावातील इतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना एक वर्षाचा कार्यकाळ होऊनसुध्दा खड्डे बुजवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील कोणताच फंड येथील ग्रामपंचायतला खर्च करता आला नाही, हे एक नवलच आहे. अशात गावातील नागरिकांना याचा त्रास होत असताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन गप्प का ?

येथील मुख्य रस्त्यासह गावातील इतर रस्ते मागील वर्षापासून नळ योजनेसाठी खोदले गेले. या रस्त्यावर आता मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे गावकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब सत्य आहे. गावातील मुख्य रस्त्यासह इतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून एक लाख रुपये खर्चून गावातील मुख्य रस्त्यासह इतर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविले जाईल.

-सुनील हिचे सचिव, ग्रामपंचायत केळवद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT