car burn road accident 
नागपूर

नागपूर : व्यावसायिकाने कारमध्ये स्वतःला घेतले जाळून; पत्नी-मुलगा जखमी

पत्नी-मुलगा जखमी, आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याने स्वत:च्या पत्नी व मुलालादेखील जाळण्याचा प्रयत्न केला मात्र, ते त्यातून बचावले. आगीत व्यावसायिकाचा अक्षरश: कोळसा झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. रामराज गोपाळकृष्ण भट (६३, रा. जयताळा) असे मृत व्यक्तीचे नाव असून आर्थिक तंगीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रामराज भट यांचे नट-बोल्ट उत्पादनाचे काम होते. विविध कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे. कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे भट आर्थिक कोंडीला सामोरे जात होते. त्यांचा मुलगा नंदन इंजिनिअर होता. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होता, मात्र त्याने नकार दिला होता. त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते. भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

आग लागल्यावर बऱ्याच वेळाने मदत

घटनास्थळ निर्जन असल्याने कोणाचेही लगेच लक्ष गेले नाही. कारने पेट घेतल्यावर बऱ्याच वेळाने लोक जवळ आले. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. बेलतरोडी पोलिस तेथे पोहोचले. भट यांचा मृत्यू झाला होता. पत्नी आणि मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली.

पॉश हॉटेलमध्ये जेवणाचा बेत

वर्धा मार्गावरील एका पॉश हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी व मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी व मुलाला पिण्यासाठी विष दिले. दोघांनाही संशय आल्याने भट यांनी हे ॲसिडिटीचे औषध असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळील बाटलीतील द्रवपदार्थ तिघांवरही फवारले आणि पत्नी व मुलाला काही समजण्यापूर्वीच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले; परंतु आई व मुलगा जखमी झाले तर वडिलांचा मृत्यू झाला.

प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून फेकली सुसाईड नोट

भट आत्महत्या करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आले होते. सुसाईड नोट त्याने पाकिटात ठेवली होती. पावसामुळे आत्महत्या करण्यापूर्वी पाकिट फॉइलमध्ये गुंडाळून कारपासून काही अंतरावर फेकून दिली होती. तेथे पोहोचल्यानंतर काही काळ पोलिसही आगीचे कारण काय आहे याबाबत संभ्रमात पडले होते. काही अंतरावर पाकिट सापडल्याने आत्महत्येचे कारण समोर आले. सुसाईड नोट कन्नड आणि इंग्रजीमध्ये लिहिली होती. प्रचंड आर्थिक विवंचनेमुळे हे पाऊल उचलत असून यासाठी कुणीही जबाबदार नसल्याचे त्यांनी त्यात लिहिले. भट यांनी बहिणींना संबोधित करताना बँकेत जमा केलेल्या रकमेची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain News: राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट! २२ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागानं काय सांगितलं?

कर्नाटकात HIV चा कहर! सात हजार विद्यार्थी एड्स पॉझिटिव्ह; महाविद्यालयांमध्ये नियमित तपासणी शिबीर घेण्याचे आदेश

Shikrapur Missing Girls: दोन मुली शिक्रापूर मधून गायब : शिक्रापूर पोलिसांनी घेतला रात्रभर शोध ; पालकांच्या भितीने मुलींनी सोडली होती घरे

Live Marathi News Update : मी भाजप-आरएसएसची माफी मागणार नाही - राहुल गांधी

Maratha Agitation Warning : मराठा समाजाच्या मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा; अन्यथा 29 ऑगस्टपासून आंदोलन : मनोज जरांगे

SCROLL FOR NEXT