नागपूर

राज्यात 'गुंडा'राज? मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोस्ट लिहिली म्हणून शिवसेना तालुकाध्यक्षाची सामाजिक कार्यकर्त्याला धमकी

बुटीबोरी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती आणि शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाध्यक्ष अनिस बावला यांनी कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक पंकज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याप्रकरणी फोन करून धमकावले.

सकाळ डिजिटल टीम

Shivsenamen Threatened Social Worker: बुटीबोरी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती आणि शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाध्यक्ष अनिस बावला यांनी कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक पंकज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याप्रकरणी फोन करून धमकावले.

याप्रकरणी त्यांनी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उल्लेख केला. या पोस्ट वरून अनिस बावला यांनी त्यांना फोन वरून पोस्टबद्दल विचारणा करीत, धमकाविले. शिवाय त्यांना भेटून समज देण्याबाबतही सुनावले.

ठाकरे यांनी त्यांना देशात हुकूमशाही सुरू आहे का, असा सवाल केला असता, उद्या सांगतो काय आहे ते, अशी धमकी बावला यांनी दिली. या प्रकारामुळे ठाकरे यांनी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवित कारवाईची मागणी केली. तसेच गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी दडपशाही सुरू असल्याचा आरोपही केला. बुटीबोरी पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी अद्याप तक्रार आली नसल्याचे स्पष्ट केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT