Nagpur Central Jail  sakal
नागपूर

Nagpur : प्रशासनाची मोठी चूक उघडकीस ; कारागृहात मोबाईल, गांजासाठी ‘कर्नाटक पॅटर्न’

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातही दररोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने मोबाईल, बॅटरी आणि गांजा जात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात असलेल्या मध्यवर्ती कारागृहात गेल्या वर्षभरात कैद्यांकडे मोबाईल, बॅटरीसह मोठ्या प्रमाणात गांजा मिळाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देत, खंडणी मागितली. त्याने हा फोन बेळगावच्या कारागृहातून केला असल्याची बाब समोर आली. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातही दररोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने मोबाईल, बॅटरी आणि गांजा जात असल्याने आता येथेही ‘कर्नाटक पॅटर्न’ राबविण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वी टावरवरून कारागृहात गांजा, मोबाईल, बॅटरी आणि सीमकार्ड फेकण्यात आल्याची घटना समोर आली. त्यामुळे कारागृहात सर्रास आजही त्याचा वापर होत असल्याचे दिसते.

कारागृहात मोबाईल, गांजा पोहचतो कसा? हे मोठे गुढ आहे. मात्र, त्यासाठी कारागृहातील रक्षक ही मोठी कडी असल्याचे दिसते. कारागृहात बंदिवानांसोबत वावरणारे रक्षकच त्यांना ते पुरविण्यात मदत करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षभरात त्यातून सहा कारवाया करीत, चार ते पाच तुरुंग रक्षकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे.

मात्र, कारवाईचा धाक न बाळगता, त्यानंतरही कारागृहात मोबाईल, बॅटरी सीमकार्ड आणि गांजाची खेप सुरूच असल्याचे दिसून येते.

टॉयलेट, जमिनीत लपविले जाते साहित्य

कारागृहात मोबाईल, सीमकार्ड, बॅटरी आणि गांजा पोहचल्यावर तो लपवून ठेवण्यासाठी कारागृहातील टोपीधारक बंदिवानाचा उपयोग केला जातो. त्यांच्या माध्यमातून टॉयलेट्स आणि जमिनीमध्ये हे साहित्य पुरविले जाते. विशेष म्हणजे, जयेश पुजारी यानेही बेळगावात अशाच प्रकारे जमिनीमध्ये मोबाईल आणि बॅटरी लपवून ठेवल्याची बाब समोर आली होती.

असे आहे रॅकेट

अट्टल गुन्हेगार जे बंदिवान म्हणून कारागृहात शिक्षा भोगत आहेत, त्यांना आवश्‍यक असलेले मोबाईल, सीमकार्ड, बॅटरी आणि गांजा यासाठी भेटीद्वारे आपली डिमांड त्यांना भेटायला येणाऱ्या साथीदारांना कळवितात. ते साथीदार कारागृह रक्षकांशी भेटतात.

यामध्ये अनेक सुटलेल्या बंदिवानांचाही समावेश असतो. ते कारागृह रक्षकांशी संपर्क करीत, त्यांच्या माध्यमातून कारागृहात साहित्य पोहचविण्याचे काम करतात. यावेळी ते साहित्य मिळवून ते लपविण्यासाठी कारागृहातील काही टोपी मिळालेल्या बंदिवानाचाही उपयोग करीत असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT