nagpur central jail sakal
नागपूर

Crime; कारागृहात सुरू झाले टोळीयुद्ध

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील घटना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृह सतत चर्चेत आहे. कैद्याकडे मोबाईल आणि गांजा आढळल्याच्या प्रकरणाने पोलिसांची झोप उडविली असतानाच आता कारागृहात टोळीयुद्ध सुरू झाले आहे. सोमवारी कारागृहात बंद शहरातील दोन खतरनाक गुंडांमध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वसंतराव नाईक झोपडपट्टी कांडचा मुख्य आरोपी व नुकताच खून प्रकरणात दोषी ठरलेला भुरू आणि ताजबागमध्ये जमिनींवर ताबा आणि खंडणी वसूलीवरून चर्चेत आलेल्या आबूमध्ये भांडण झाले. आबूने भुरूच्या कुटुंबातील सदस्यावर असभ्य टोमणा मारल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून दोघांचा वाद शिगेला पोहोचून हाणामारीला सुरुवात झाली. भुरूने आबूला जबर मारहाण केली.

त्याचा चेहरा, ओठ आणि कंबरेला जबर मार लागल्याची माहिती मिळाली आहे. कारागृहातील रुग्णालयातच त्याच्यावर उपचार करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने त्याला फासी यार्डमध्ये स्थानांतरित केले जाऊ शकते. काही दिवसांपासून भुरू आणि आबूमध्ये कुरबूर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कारागृहात आबू एकटा पडला आहे आणि भुरूच्या टोळीने आपले वर्चस्व निर्माण करून ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT