Chief Justice Uday Lalit 
नागपूर

सरन्यायाधीश उदय लळीत यांचे नागपूरशी भावनिक संबंध

वडील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशाचे ४९ वे सरन्यायाधीश उदय लळीत यांचे नागपूर शहराशी भावनिक संबंध आहेत. त्यांचे वडील न्यायमूर्ती उमेश लळीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते. त्यामुळे, त्यांनी महाविद्यालयीन जीवनातील काही वर्षे शहरात घालविली आहेत. शहराशी निगडित त्यांच्या अनेक आठवणी आहेत.

सरन्यायाधीश उदय लळीत यांचे वडील १९७३ ते ६ फेब्रुवारी १९७६ या काळात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. दरम्यान, ते सिव्हिल लाइन्स येथील सौदामिनी बंगल्यामध्ये राहत होते. त्यावेळी सरन्यायाधीश उदय लळीत महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. त्यानंतर, ते मुंबईत स्थानांतरित झाले. त्यांनी कायद्याची पदवी मिळवून आधी मुंबई उच्च न्यायालयात व पुढे सर्वोच्च न्यायालयात वकिलीला सुरवात केली. त्यांनी काही प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही युक्तिवाद केला आहे. तसेच, नागपूर व विदर्भातील अनेक प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवातर्फे सिव्हिल लाइन्सस्थित देशपांडे सभागृह येथे १५ मार्च २०१५ रोजी आयोजित वकिलांच्या परिषदेत सरन्यायाधीश उदय लळीत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी नागपूरला आले होते.

पहिला सत्कार नागपूरमध्ये

हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर (एचसीबीए)तर्फे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार समारंभ पुढील शनिवारी (३ सप्टेंबर) आयोजित करण्यात आला आहे. सिव्हिल लाईन येथील वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये सायंकाळी ६.३० वाजता हा समारंभ पार पडेल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे, सचिव ॲड. अमोल जलतारे, कोषाध्यक्ष ॲड. माधव लाखे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असेल. सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देशात प्रथम नागपुरनगरीमध्ये त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, हे विशेष.

वकिली क्षेत्रामध्ये येण्यापूर्वीचा काही काळ त्यांनी नागपूर नगरीमध्ये घालविला आहे. त्यावेळपासून नागपूर शहरातील एक जागा त्यांच्या मनामध्ये घर करून आहे. सिव्हिल लाइन्समधील वसंतराव देशपांडे सभागृहाजवळ असलेल्या दर्ग्यावर ते माथा टेकवायला जायचे, अशी आठवण ॲड. सुधीर पुराणिक यांनी सांगितली. नागपूर आगमनानंतर देखील ते या दर्ग्याला भेट देण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT