Forest  sakal
नागपूर

Nagpur : दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

चिखलदरा वनपरिक्षेत्रात वैराट सफारी झोनमधील घटना

सकाळ वृत्तसेवा

चिखलदरा : चिखलदरा वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर अधिक प्रमाणात वाढला आहे. त्यातच त्यांच्यात आता झुंजी होताना दिसत आहे. दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २९) सायंकाळी पाचच्या सुमारास वैराट वर्तुळातील पाचंबा बीटमध्ये घडली. वनकर्मचाऱ्यांची गस्त सुरू असताना हा प्रकार उघडकीस आल्यामुळे त्यासंदर्भातील माहिती वरिष्ठांना देण्यात आली.

गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, चिखलदरा येथील सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. मयूर भैलुमे यांच्यासह एनटीसीए व वन्यजीवक्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी राकेश महल्ले, अलकेश ठाकरे, वनपाल सावळे, वनरक्षक शनवारे यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली.

यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धंदर यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात तपासणी करून पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये मृत वाघाचे सर्वच अवयव दात, नखे, मिशांसह इतर भाग जसेच्या तसे कायम आहेत. प्रथमदर्शनी वाघाच्या मानेवर दुसऱ्या वाघाच्या दाताच्या खुणा दिसून आल्या. शिवाय वाघाच्या अंगावरही दुसऱ्याने नखाने ओरबाडल्याचे दिसून येते.

बऱ्याच ठिकाणी जखमा दिसल्या. त्यावरून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनुसार दोन वाघांच्या भांडणामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळासह आसपास असलेला कॅमेरा ट्रॅपही वनाधिकाऱ्यांनी या घटनेनंतर तपासला होता. वरिष्ठांना त्यासंदर्भातील विस्तृत अहवाल पाठविण्यात आला आहे.

वाघावर अंत्यसंस्कार

शवविच्छेदनानंतर मृत वाघाला एनटीसीएच्या सूचनेप्रमाणे उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग सुमंत सोळंके, मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे विभागीय वनअधिकारी मनोज खैरनार, इंद्रजित निकम, कमलेश पाटील, डॉ. मयुर भैलुमे, एनटीसीए व वन्यजीव तज्ज्ञ प्रतिनिधी राकेश महल्ले, अलकेश ठाकरे, जयदीप पाटील, वनपाल श्री. कळसकर, श्री. साळवे यांच्या उपस्थितीत अग्नी देण्यात आला. असे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पशुशल्य चिकित्सकांच्या उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. दोन वाघांतील झुंजीनंतर मोठ्या वाघाने केलेल्या हल्ल्यात लहान वाघाचा आंतरिक रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आले.

-सुमंत सोळंके, उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा.

मृत वाघाचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असावे. वन्यप्राण्यांच्या शिकारीवरून किंवा वाघाच्या टेरिटोरियल क्षेत्रात दुसरा वाघ आल्यावर पण दोन वाघांत अशा झुंजी होतात.

-डॉ. मयूर भैलुमे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT