Nagpur city police reshuffle Nagpur police news
Nagpur city police reshuffle Nagpur police news 
नागपूर

Breaking : सहायक आयुक्त, निरीक्षकांच्या बदल्या; नागपूर शहर पोलिस दलात मोठे फेरबदल

योगेश बरवड

नागपूर : शदर पोलिस दलात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्तांसह पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काहींना अपेक्षित तर काहींच्या मनाविरुद्ध बदल्या झाल्याने कही खुशी, कही गम असे चित्र सद्या दिसून येत आहे.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी सहायक आयुक्तांसह २१ निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. गुन्हेशाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्याकडे सदर विभागाचा कार्यभार आणि सीताबर्डी विभागाचीही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सदर विभागाच्या रेखा भवरे यांना विशेष शाखेत पाठविण्यात आले आहे.

जरीपटका विभागाचे सहायक पोलिस आयुक्त पी. एम. कार्यकर्ते याच्याकडे एमआयडीसी विभागाच्या जबाबदारीसह सोनेगाव विभागाचाही अतिरिक्तभार देण्यात आला आहे. निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये काहींची कायमस्वरूपी तर काहींची प्रभारी स्वरूपात बदली करण्यात आली आहे. तक्रार निवारण कक्षाच्या व्ही. जे. मांडवधरे मानकापूरच्या प्रभारी असतील.

गुन्हे शाखेचे जी. के. कल्याणकर यांच्याकडे गिट्टीखदान पोलिस ठाणे, आरोपी सेलचे भारत क्षीरसागार यांची गणेशपेठ ठाण्यात, गुन्हेशाखेचे विनोद चौधरी यांची अजनीत, किशोर पर्वते - नंदनवन, अशोक मेश्राम यांची यशोधरानगर तर सदरचे अमोल देशमुख यांची कपिलनगर ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. 

गिट्टीखदानचे सुनील चव्हाण - आर्थिक गुन्हेशाखा, यशोधरानगरचे रमाकांत दुर्गे -विशेष शाखा, नंदनवनचे सांदिपन पवार - गुन्हेशाखा, मानकापूरचे गणेश ठाकरे - नियंत्रण कक्ष, आर्थिक गुन्हेशाखेचे ललित व्हर्टिकर -विशेष शाखा, कपिलनगरचे एम.डी.शेख -गुन्हेशाखा, नियंत्रण कक्षाचे एस. एस. कुमरे - गुन्हेशाखा,

आर्थिक गुन्हेशाखेचे प्रशांत माने सीताबर्डी, अजनीचे प्रदीप रायण्णावार, गिट्टीखदानचे एस. एस. अढाऊ, शांतीनगरचे के. बी. उईके यांची गुन्हेशाखेत, गुन्हेशाखेच्या तृप्ती सोनवणे यांची जरीपटका, वाहतूक शाखेच्या आशालता खापरे यांची सदर ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT