Nagpur  Esakal
नागपूर

Lok Sabha : दुसऱ्या टप्प्यातील जागावाटपाच्या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, 'या' दिवशी होणार जागावाटप

लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे येत्या दोन-तीन दिवसात जाहीर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांशी बोलताना दिली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Seat Allocation for Loksabha: लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे येत्या दोन-तीन दिवसात जाहीर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, त्यांना दुसरे काही काम आहे का? पदाधिकाऱ्यांच्या बैठका निवडणूक काळामध्ये सातत्याने होत असतात. आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवतो आहे. शेवटी ग्रासरूटपर्यंत पदाधिकारी, कार्यकर्ते काम करत असतात. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर जावे लागते. ते आम्ही काम करतो आहे. s

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सर्व नेते, सर्व कार्यकर्ते फिल्डवर काम करीत आहेत. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याचा घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्यावे. महाविकास आघाडीत ‘तीन तिघाडा आणि काम बिघाडा’ अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही. (Latest marathi News)

रामटेक आणि वाशिम-यवतमाळ या दोन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकू, असेही ते म्हणाले.विरोधकांना टीका करण्यापेक्षा दुसरे काही कामच उरले नाही. गेल्या दीड वर्षात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्या सर्वांसमोर आहेत. जनतेच्या हितासाठी आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही झटत आहोत, असेही शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT