Nagpur Crime News sakal media
नागपूर

Nagpur Crime: कोळसा उद्योजकाला मागितली एक कोटीची खंडणी

ब्लॅकमेलिंग रॅकेटचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Crime News : शहरातील एका प्रतिष्ठित कोळसा उद्योजकाला केंद्रीय कोळसा मंत्र्याच्या ओएसडी असल्याचे सांगून ब्लॅकमेल करीत, त्याच्याकडून १ कोटीची खंडणी मागणाऱ्या रॅकेटचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला.

दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. यामध्ये काही तथाकथित पत्रकाराचाही समावेश आहे. पीयुष पुरोहित (वय ३०), मयंक कुमार उर्फ वंश अग्रवाल असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीं शहरातील एका प्रतिष्ठित कोळसा व्यापाऱ्याविरोधात एका Rashtrabhan.in या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बदनामीकारक वृत्त छापण्यास सुरुवात केली. त्यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात धाव घेतली.

यावेळी त्यांना न्यायालयाने याबाबत काहीही प्रकाशित करण्यास मनाई केली. त्यामुळे आरोपींनी प्रथम तक्रारदाराच्या पुतण्याला भेटून त्यांच्या विरोधात लेख प्रकाशित न करण्यासाठी एक कोटीची मागणी केली.

पुतण्याने त्याची मागणी फेटाळून लावल्यावर आरोपीने त्याला आणि तक्रारदाराला कोळशाच्या काळाबाजाराच्या गुन्ह्याखाली फसवण्याची धमकी दिली. तसेच पुतण्याला शारिरीक मारहाण केली. तिन्ही आरोपींनी गेल्या दोन महिन्यांपासून उद्योगपतीकडे खंडणीची अवैध मागणी सुरूच ठेवली होती.

कोळसा उद्योजकाला मागितली एक कोटीची खंडणी

आरोपींनी उद्योगपतीविरुद्ध कोळसा मंत्रालय आणि इतर विविध सरकारी विभागांकडे अनेक तक्रारीही केल्याचे सांगितले. मंयक कुमारने तक्रारदाराला कोळसा मंत्र्याच्या ओएसडी असल्याचे फोन करून त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी असल्याचे सांगितले. मात्र, त्यावर याबाबत न्यायालयात केस दाखल असून त्यावर सुनावणी सुरू

असल्याचे तक्रारदात्याकडून सांगण्यात आले. त्यानंतरही त्याने चक्क कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या लेटरहेडवर याची माहिती दिली. शिवाय तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सीबीआय अधिकाऱ्यांना शहरात आणून त्याची पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली बुक करण्यास सांगितले.

मात्र, याबाबत तक्रारकर्त्याने माहिती घेतली असता, तो तोतया ओएसडी असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी सायबर सेलला तक्रार केल्यावर याप्रकरणी दोघांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT