maleria
maleria 
नागपूर

नातेवाईकांची आयडियाची कल्पना, हॉस्पिटलमधील रुग्णापर्यंत अशाप्रकारे पोहोचविली जाते दारू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : "देवाची करणी...नारळात पाणी' ही म्हण साऱ्यांना माहीत आहे. उन्हाळा असो की, हिवाळा सर्वच ऋतूंमध्ये नारळाचे पाणी आपण आनंदाने पितो. अनेक आजारांवर ते गुणकारी असल्याचा आजीबाईचा बटवा सांगतो. मात्र, या शहाळाच्या पाण्यात मद्य अर्थात दारू मिसळून ते रुग्णांना दिल्याचे प्रकार मेडिकलच्या वॉर्डात उघडकीस आले आहेत. रुग्णांच्या मागणीनुसार मित्रांकडून किंवा एखाद्या नातेवाइकांकडून नारळाच्या पाण्यात दारू टाकून त्याला दिली जाते. यामुळे मेडिकलच्या वॉर्डांमध्ये अशा नारळांवर बंदी घालण्यात यावी असा सूर एका बैठकीतून पुढे आला आहे. 

शहाळेपाणी म्हणजे शरीरासोबत मनासाठीही आल्हाददायक, प्रसन्न आरोग्यदायी चिकित्सा आहे असे सांगण्यात येते. यशिवाय किडनीचे विकार, सर्दी, खोकला, दमा असलेल्या व्यक्तींना नारळपाणी अतिशय लाभदायी आहे, असे आयुर्वेदाचार्य सांगतात. दुपारच्या वेळेस नारळ पाणी पिणे उत्तम मानलं जातं. क्षणात तरतरी येते. कृत्रिम शीतपेयांचा मोह टाळून नैसर्गिक कोल्ड आणि हेल्थ ड्रिंक म्हणून नारळपाण्याचा आस्वाद प्रत्येकाने घ्यावा, असा सल्ला डॉक्‍टर देतात. मात्र, आरोग्य मंदिर असलेल्या मेडिकलमध्ये नारळ पाण्यात दारू मिसळून रुग्णांना पुरवठा केला जातो.

अगदी काही दिवसांपूर्वी एका वॉर्डात रुग्णाच्या नातेवाइकाकडूनच असा प्रकार झाल्याचे उघडकीस आले. यामुळे डॉक्‍टरांनी आश्‍चर्य व्यक्त केले. त्यामुळे येथील वॉर्डात नारळ नेण्यावर प्रतिबंध घालावे, अशी मागणीच वैद्यकीय अधीक्षकांकडे करण्यात आली होती. मेडिकलमधील औषधशास्त्रसह इतरही वॉर्डात मद्यपी रुग्ण भरती असतात. बरे होत असताना त्यांना मद्याची आठवण होते. रुग्णांच्या आग्रहावरून त्यांचे मित्र किंवा नातेवाईक लपून-छपून त्यांना नारळ पाण्यातून दारू पोहोचवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात धूळफेक 
वॉर्डाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात असतो. परंतु, त्याला नारळ पाणी असल्याचे सांगण्यात येते. शहाळाच्या पाण्यात मद्य मिसळून रुग्णांपर्यंत अतिशय शिताफीने पोहोचवले जाते. काही दिवसांआधी येथील डॉक्‍टरांना काही रुग्ण मद्य प्राशन करून असल्याचे आढळले. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सूक्ष्म निरीक्षण केले असता रुग्णाचे मित्र किंवा नातेवाइकांकडून नारळ पाण्यात दारू आणली जात असल्याचे पुढे आले. 

नारळ डोक्‍यावर पडण्याची भीती 
नारळ पाणी पिऊन झाल्यानंतर ते नारळ नातेवाईक तिसऱ्या माळ्यावरील वॉर्डातून खाली फेकतात. त्यामुळे येथील मलवाहिनी अवरुद्ध होण्याची भीती आहे. तसेच खाली उभे असलेल्यांच्या डोक्‍यावर पडून ते जखमी होण्याचीही भीती आहे, ही बाब लक्षात घेता रुग्णाला नारळ पाणी द्यायचे असेल तर ते ग्लासमध्ये देण्याची मागणी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT