थंडी sakal
नागपूर

Nagpur : नागपूरकरांनी अनुभवली सर्वाधिक थंड रात्र

पारा प्रथमच ९.९ अंशांवर, गोंदिया @ ८.८

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भातील थंडीच्या लाटेने उग्ररूप धारण केले असून, तापमानाने शुक्रवारी या वर्षातील नवा नीचांक नोंदवला गेला. नागपूरचा पारा या हिवाळ्यात प्रथमच दहाच्या खाली आला. नागपूरकरांसाठी गुरुवारची रात्र सर्वाधिक थंड होती. गोंदिया येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.

राजस्थानकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे सध्या मध्य भारतात थंडीची लाट पसरली आहे. लाटेचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये जाणवत आहे. कडाक्याच्या थंडीने विदर्भालाही कवेत घेतले आहे. शुक्रवारीदेखील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीने कहर केला. गुरुवारच्या तुलनेत नागपूरचा पारा आणखी एका अंशाने घसरून यंदाच्या मोसमात प्रथमच दहाच्या खाली (९.९ अंशांवर) आला. गेल्या तीन दिवसांत नागपूरच्या किमान तापमानात तब्बल सात अंशांची घट झाली आहे.

नागपूरकरांनी अनुभवली सर्वाधिक थंड रात्र

गोंदियाचा पाराही दीड अंशाने घसरून ८.८ वर आला. येथे नोंद झालेले तापमान विदर्भात सर्वात कमी राज्यात दुसरे नीचांकी ठरले. इतरही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. कमाल तापमानातही सतत घसरण होत आहे. गारठा व बोचऱ्या वाऱ्यांमुळे तरुणांसह सारेच त्रस्त आहेत. थंडीपासून बचावासाठी ऊनी कपडे व शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. केवळ रात्रीच नव्हे, दिवसाही गारव्याचा त्रास होत आहे.

वादळी पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे शनिवारनंतर विदर्भात ढगांची दाटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरसह अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा बसू शकतो. पाऊस व ढगाळ वातावरण दोन-तीन दिवस राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

विदर्भातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)जिल्हा तापमान

  • गोंदिया ८.८

  • नागपूर ९.९

  • यवतमाळ १०.५

  • वर्धा ११.०

  • बुलडाणा ११.०

  • अकोला ११.३

  • ब्रम्हपुरी ११.३

  • अमरावती ११.४

  • वर्धा १२.४

  • चंद्रपूर १२.०

  • गडचिरोली १२.४

  • वाशीम १३.२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT