गार्डन  sakal
नागपूर

Nagpur : मुलांना घेऊन बगिच्यात येताय, जरा जपून

कारण गार्डनमध्ये मांडीभर खड्डा पडला आहे

सकाळ वृत्तसेवा

बुटी ले-आऊट : सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. सुटीच्या दिवसांत सायंकाळी बच्चे कंपनीचा भर मैदानी खेळावर असतो. त्यामुळे मोठ्या संख्येने मुलं बगिच्याकडे वळतात. परंतु व्हीव्हीआयपींची वस्ती असलेल्या लक्ष्मीनगरातील बुटी ले-आऊटमधील गार्डन तुम्ही चिमुकल्यांसह येत असाल तर सावध राहा. कारण गार्डनमध्ये मांडीभर खड्डा पडला आहे. जो लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक आहे. याशिवाय अनेक समस्या येथे आहेत.

शहरातील सर्वसामान्यांच्या वस्तीतील गार्डनचीच अवस्था खराब आहे, असे नाही. व्हीआयपी किंवा राजकीय नेत्यांच्याही वस्तीला उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. याचे जिवंत उदाहरण लक्ष्मीनगर येथील बुटी ले-आऊटमधील गार्डन आहे. येथे माजी आमदार राहतात. अगदी त्यांच्या घरासमोर मनपाचे छोटे मैदान आहे.

एका राजकीय नेत्याच्या वस्तीत गार्डन असल्याने साहजिकच चांगल्या सोयी-सुविधांची अपेक्षा असते. मात्र, येथील गार्डन पाहून ती अपेक्षा फोल ठरते. गार्डनचा फेरफटका मारला असता जागोजागी कचरा व पालापाचोळा पडलेला दिसला. गार्डनची एकूणच अवस्था पाहून, येथे नियमित स्वच्छता होत असेल असे अजिबात वाटत नाही. गार्डन आहे पण हिरवळ (लॉन) अजिबात नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र चिखल साचतो. शिवाय टाइल्स उखडल्या व तुटलेल्या आहेत.

मांडीभर खड्डा पडला आहे, जो लहान मुलांसाठी धोकादायक आहे. उल्लेखनीय म्हणजे, येथे परिसरातील नागरिकांना शतपावलीसाठी साधा वॉकिंग ट्रॅकदेखील नाही. गार्डनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर खेळणी आहेत. मात्र त्याचीही अवस्था फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे येथे मनोरंजन व विरंगुळ्यासाठी येणाऱ्यांसाठी हे गार्डन डोकेदुखी अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मक्का मदिनाजवळ भीषण अपघात! ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू; डिझेल टँकरला बस धडकली अन्...

Congo Mine Accident : तांब्याच्या खाणीवर पूल कोसळला, ४० कामगारांचा मृत्यू, शेकडो जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Vanaz Metro Subway Issues : रस्ता ओलांडायचा तर भुयारी मार्गातूनच; पण अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला

Stainless Steel vs Glass Electric Kettle: स्टेनलेस स्टील कि काचेची इलेक्ट्रिक केटल? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फरक

Kalyan-Dombivli Politics:'दीपेश म्हात्रे यांच्या प्रवेशामागे कोण?'; कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं, भाजपमधील इनसाईड गेमची मोठी चर्चा..

SCROLL FOR NEXT