Nagpur Complaints of citizens in Guardian Minister public meeting sakal
नागपूर

नागपूर : ‘पालकमंत्री लोकसंवाद’मध्ये तक्रारींचा पाऊस

नितीन राऊत : १५ दिवसांत निपटारा करण्याचे प्रशासनाला निर्देश

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पालकमंत्री लोकसंवादमध्ये तक्रारींचा पाऊस पडला. यात सर्वाधिक तक्रारी महानगर पालिकेशी संबंधित होत्या. जिल्हाधिकारी व नागपूर सुधार प्रन्यास कार्यलयाशी संबंधित बऱ्याच तक्रारी होत्या. पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ दिवसांच्या आता तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश दिले.

यावेळी आमदार अभिजित वंजारी, आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी आर. विमला, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, याशिवाय सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जटील व कठीण प्रश्नांना त्यांनी स्वतःकडे घेतले. यासंदर्भात पालकमंत्री कार्यालयाला पत्र द्यावे, या समस्यांचा निपटारा स्वतः लक्ष घालून करेल. तर काही महत्वपूर्ण प्रश्न मंत्रालयात बसून सोडवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी तक्रारकर्त्यांना दिले. आजच्या लोकसंवाद कार्यक्रमात एकूण १९२ प्रकरणांवर चर्चा झाली. यात जिल्हाभरातील शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच शहरातील सार्वजनिक सोसायटी, पट्टेधारक यांचा सहभाग अधिक होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आप2ल्या समस्या सांगताना शब्द फुटत नव्हते. अशावेळी त्यांच्या लेखी तक्रारीवरून न्याय देण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली.

काही समस्या त्यांनी जागेवरच निकाली काढल्या. शंभर तक्रारीवर त्यांनी पुढील आठवड्यात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांना कालमर्यादेत पूर्ण करायच्या समस्यांबाबत सर्वाधिकार देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात ज्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

टोकन व्यवस्था

सेतू केंद्रातून संबंधित तक्रारकर्त्याला टोकन देण्यात येत होते. टोकन मिळालेल्या नागरिकांना बचत भवनामध्ये प्रवेश दिला जात होता. इथे पालकमंत्र्यांनी तक्रारकर्त्याची गाऱ्हाणी ऐकून घेतले. शांततेत सर्व प्रक्रिया पार पडली.

पालकमंत्री आले तास भर उशिरा

लोससंवादाची वेळ सकाळी ११ वाजताची होती. त्यानुसार लोक उपस्थित झाले. परंतु पालकमंत्री १ तास उशिरा आले. त्यामुळे लोकांना उन्हात तात्कळत वाट पाहावी लागली.

प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन

लोकसंवादच्या स्थळी नागरिकांची गैरसोय होता कामा नये यासाठी प्रशासनाकडे नियोजन करण्यात आले. आवश्यक तयारही करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण लोकसंवाद शांततेत पार पडला. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी निशिकांत सुके, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, पीयूष चिवंडे, शेखर घाडगे, शिवराज पडोळे, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अविनाश कातडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

विभागनिहाय तक्रारी

मनपा ः ५४ जिल्हाधिकारी कार्यालय ः ४६ नासुप्र ः २०

सिटी सर्वे ः १५ जिल्हा परिषदः १० एमईसीबी ः १३

म्हाडा ः २ आदिवासी विभागः ६ पीडब्ल्यूडी ः ४ पोलिस ः ८ नगर रचना ः १ कृषी ः २ नगर परिषदः २ इतर ः १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT