police esakal
नागपूर

Nagpur: कडेकोट बंदोबस्त! काँग्रेसच्या सभेसाठी तब्बल इतके पोलीस तैनात, वाहतूक नियंत्रणाचे पोलिसांसमोर आव्‍हान

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील उमरेड मार्गावरील मैदानावर उद्या (२८ डिसेंबरला) सभेचे आयोजन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Congress Maharally in Nagpur: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील उमरेड मार्गावरील मैदानावर उद्या (२८ डिसेंबरला) सभेचे आयोजन केले आहे. सभेदरम्यान वाहतुकीची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय कार्यक्रमात देशभरातील काँग्रेसचे ‘व्हीआयपी’ नेते सहभागी होणार असल्याने पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

पोलिसांकडून सभेसाठी चार पोलिस उपायुक्त, चार साहाय्यक पोलिस उपायुक्त आणि आठ पोलिस निरीक्षकांसह साडेचारशे पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. सहायक पोलिस आयुक्तांसह १५ सहायक पोलिस निरीक्षक तसेच १७४ वाहतूक पोलिसांची नेमणूक केली आहे.

अशी असेल वाहतूक व्यवस्था

वाहतूक विभागाच्या अधिसूचनेनुसार नागपूर ते उमरेड रोडने जाणारी वाहतूक दुचाकी, कार, ऑटो चामट चक्की चौकाजवळून म्हाळगीनगर चौक व पुढे पिपळामार्गे अमरावती-जबलपूर रिंग रोडने विहीरगावजवळून पुलाखालून उमरेड, भिवापूर, पवनीमार्गे जातील. ट्रक, बस, व अन्य अवजड वाहने आवारी चौकातून डावे वळण घेऊन क्रीडा चौक,

तुकडोजी चौक, मानेवाडा चौक, म्हाळगीनगर चौकातून उजवे वळण घेऊन पिपळामार्गे जातील. उमरेडकडून येणारी वाहतूक विहीरगाव पुलाजवळून डावीकडे वळण घेऊन हुडकेश्वर खुर्द पुलाखालून म्हाळगीनगर चौक या मार्गाने वळविण्यात आली आहे. ही अधिसूचना गुरुवारी सकाळी ८ ते रात्री ९ दरम्यान लागू राहणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Tilekarwadi Post Office Record: टिळेकरवाडीला नवे पोस्ट ऑफिस; आठ दिवसांत १०११ खाती उघडून विक्रमी कामगिरी

SCROLL FOR NEXT