Nagpur  Esakal
नागपूर

Nana Patole: 'आघाडीचा धर्म पाळला जात नाही', 'या' जागेवरुन काँग्रेसमध्ये रोष, पटोलेंनी व्यक्त केली नाराजी

सांगली आणि भिवंडीची उमेदवारी जाहीर करताना नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nana Patole on Bhiwandi Constituency: सांगली आणि भिवंडीची उमेदवारी जाहीर करताना नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे. या संदर्भात हायकमांडला आम्ही प्रस्ताव दिला असल्याचे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

सांगली आणि भिवंडीत काही करू नका, नाहीतर तिकडे त्याचे परिणाम होतील असे आधीच बैठकीत आपण सांगून आलो होतो. त्यानंतरही भिवंडीत शरद पवार यांनी उमेदवार जाहीर केला.

महाविकास आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनही पाळला जात नाही. आम्ही हायकमांडला प्रस्ताव दिला आहे. ते जे सांगितले ते आम्ही मान्य करू. पश्चिम महाराष्ट्रातील दोन जागा आणि मुंबईतील एका जागेचा प्रश्न होता. हा प्रश्न सामोपचाराने सोडवायला हवा होता. परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. यावर विचार करावा, असेही नाना पटोले म्हणाले.

विदर्भात आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांभाळून घेतले. परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वेगळे निर्णय घेतले जात आहेत.

अशा पद्धतीने उमेदवार जाहीर केल्यास कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होतो. याचा परिणाम संपूर्ण राज्यातील निवडणुकीवर होण्याचा धोका असल्याचा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

वंचितसोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत. दोन जागा देण्याची तयारी आहे. माझा अधिकार वापरून दोन जागा देण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. मतविभाजन करू नका, अशी माझी विनंती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT