Nagpur Corona test started at railway station sakal
नागपूर

नागपूर : अखेर रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी सुरू

संशयित १० प्रवाशांची ॲन्टीजेन टेस्ट

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचा प्रकोप वाढत असूनही मध्य रेल्वे स्थानकावर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात नव्हती. विशेषतः दिल्लीत कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. तरीही तेथून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी होत नव्हती. ‘सकाळ’ने याबाबत वृत्त प्रकाशित करताच प्रशासन यंत्रणा सतर्क झाली. शनिवारपासून येथे चाचणीला सुरवात झाली. दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत १० संशयित प्रवाशांची ॲन्टीजेन चाचणी करण्यात आली.

महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ व्यवस्था करून कोरोनाची ॲन्टीजेन आणि आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संशयित प्रवाशांवर नजर ठेऊन त्यांची ॲन्टीजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये ओडिशा, अलाहाबाद, गोंदिया आणि स्थानिक सफाई कर्मचारी व कुलींचा अशा १० लोकांची चाचणी करण्यात आली.

या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. जर ॲन्टीजेन चाचणीत ज्या प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करून त्याचे नमुने मेयो रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रविवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजता पर्यंत चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारपासून २४ तास रेल्वे स्थानकावर ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. दिल्लीसह इतरही ठिकाणची कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT