मागील तीन महिन्यातील मृत्यूंचा उच्चांकी आकडा नोंदवला आहे मागील २४ तासांत कोरोनाने २३ बळी घेतले. या मृतकांमध्ये नागपुर शहरातील १४ तर ग्रामीण भागातील ६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरचे ३ मृत्यू आहेत. 
नागपूर

Nagpur Corona Update: कोरोनाचं रौद्ररुप; एकाच दिवशी तब्बल ३ हजार ७९६ बाधित आणि २३ मृत्यू

केवल जीवनतारे

नागपूर ः दर दिवसाला जिल्ह्यात कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाचे रुग्ण विक्रमी संख्येने आढळ्यामुळे नागपुरकरांच्या ह्दयाचा ठोका चुकण्याची वेळ आली आहे. गुरूवारी (ता.१८) ३ हजार ७९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. मागील १२ महिन्यातील सर्वाधिक उच्चांकी आकडा आहे. त्यातच मागील तीन महिन्यातील मृत्यूंचा उच्चांकी आकडा नोंदवला आहे मागील २४ तासांत कोरोनाने २३ बळी घेतले. या मृतकांमध्ये नागपुर शहरातील १४ तर ग्रामीण भागातील ६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरचे ३ मृत्यू आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधिताचा आकडा आता दोन लाखाच्या दिशेने झेप घेत आहे. गुरूवारी १ लाख ८२ हजार ५५२ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ४ हजार ५२८ जणांचा बळी आतापर्यंत गेले आहेत. गुरूवारी कोरोनावर मात करणाऱ्यां रुग्णांची संख्या १ हजार २७७ होती. यामुळे आतापर्यंत १ लाख ५४ हजार ४१० लोकांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा टक्का प्रचंड गतीने खाली येत आहे. तर मृत्यूचा टक्का वाढण्यास सुरूवात झाली आहे. 

 मेयो मेडिकल आणि एम्ससहित जिल्ह्यातील ११३ खासगी रुग्णालयात ४ हजार ५४८ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या १६ हजार ७४७ झाली आहे. ज्या प्रमाणात गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या वाढेल त्याच तुलनेत अधिक गतीने कोरोनाचा विषाणू हात पसरणार असल्याची चिंता वैद्यक क्षेत्रामध्ये व्यक्त होत आहे.

चाचण्यांचाही विक्रम

कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच प्रशासनाकडून चाचण्यांचीही संख्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळेच दररोज चाचण्यांचे नवनवीन उच्चांक दिसत आहेत. गुरुवारी शहर व ग्रामीण भागात तब्बल १६ हजार १३९ चाचण्या झाल्या. त्यापैकी तब्बल २३.५२ टक्के अहवाल कोरोनाबाधित आढळले. यात शहरातून २ हजार ९१३ तर ग्रामीणमधून ८८० आणि जिल्ह्याबाहेरील ३ असे बाधित आढलले. शा उच्चांकी ३ हजार ७९६ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटून ८४.५८ टक्क्यांवर आले. सध्यस्थितीत शहरात १९ हजार ०६६ आणि ग्रामीणमध्ये ४ हजार ५४८ असे २३ हजार ६१४ कोरोनाबाधित जिल्ह्यात आहेत. यातील लक्षणे नसलेले १६ हजार ७४७ जण गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले ६ हजार ८६७ जण शासकीय, खासगी रुग्णालयांसोबतच कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे.

२०२१ मधील मृत्यूसंख्येचा उच्चांक

ऑगस्ट २०२० मध्ये ८७७ मृत्यू झाले होते. तर २२ हजार९४८ बाधितांची नोंद झाली होती. सप्टेंबर २०२० मध्ये १ हजार १५१ जणांचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला होता. तर ३५ हजार ७४९ बाधितांची नोंद झाली होती. यानंतर आता जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील मृत्यूचा उच्चांकी आकडा गुरूवार १८ मार्च रोजी मृतकांच्या संख्येतही उच्चांकी पहायला मिळाली आहे. २३ जणांचा मृत्यू झाला. सद्या १ ते १८ मार्च दरम्यान ३२ हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT