tea esakal
नागपूर

Nagpur : नऊ प्रकारच्या चहाची निर्मिती करणारी ‘नवदुर्गा’

चहाला वेळ नसली तरी चालेल पण वेळेला मात्र चहा हवाच

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारतीयांचे सर्वात लोकप्रिय पेय कोणत? अस विचाराल तर आपसूकच चहाचे नाव समोर येईल. चहाला वेळ नसली तरी चालेल पण वेळेला मात्र चहा हवाच'', असंच काहीसे चहाप्रेमींचे आहे. हे लक्षात घेऊनच नवरात्रीच्या निमित्ताने जिवीका राय -अहिरकर हिने नऊ प्रकारचे फ्लेवर चहा विकसित केलेत. ते पिण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही तर घरच्या घरी तयार करून त्याचा आनंद घेता येणार आहे.

चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करू शकते. ग्रीन टीमध्ये दुधाचा वापर केला जात नाही. विविध आजारांचे प्रमाण वाढू लागल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे झालेले आहे. आयुष मंत्रालयाने कोरोनाच्या काळात काढा, तुळशीचा चहा, गरम पाण्याचे सेवन यासारख्या घरगुती उपचारपद्धती सामान्य लोकांसाठी शेअर केल्यात. जर नियमित आणि योग्य प्रमाणात चहाचे सेवन केल तर श्‍वसन विकारांपासून बचाव होऊ शकतो.

कोरोनाच्या काळात चहाचे महत्त्व वाढल्याचे लक्षात आल्याने जिवीकाने वडील अनिल अहिरकर यांच्या मार्गदर्शनात विविध प्रकारचे फ्लेवर चहा तयार करण्याचा संकल्प केला. इंस्टंट फुडच्या क्षेत्रात चांगली संधी असल्याचे लक्षात आल्याने जिवीकाने अनेक संशोधने वाचली. अनेकांसोबत चर्चाही केली.

तिने नैसर्गिक साहित्यांचा वापर करून विविध प्रकारचे चहाचे फ्लेवर तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यातून नऊ ते दहा प्रकराच्या फ्लेवर चहाची निर्मिती झालेली आहे. त्यात मसाला, चॉकलेट, इराणी, अद्रक, पान चहा, बटर स्कॉच, व्हॅनिला, रोज, केसर चहाचा समावेश आहे. सर्वच चहा नैसर्गिक आहेत. यामुळे हा चहा पिण्यासाठी आता हॉटेल अथवा इतरत्र जाण्याची गरज नाही.

नऊ प्रकारच्या चहाची निर्मिती करणारी ‘नवदुर्गा’

घरीच चहा तयार करून आनंद घेऊ शकणार आहेत. सोबतच ग्रीन टीही आणली आहे. तिची बाजारपेठही मोठी असून सतत वाढत असल्याचे जिवीका हिने सांगितले.

जिवीका हिने बी. कॉमचे शिक्षण घेतले असून सीए होण्याची इच्छा होती. मात्र, लग्नानंतर शिक्षणात खंड पडल्याने सीए होता आले नाही. मात्र, इंस्टंट फुडच्या व्यावसायात शाही इंस्टंटच्या माध्यमातून इंस्टंट खाद्याच्या क्षेत्रात चार वर्षात तिने पाय रोवले आहेत. व्यवस्थापन आणि मार्केटिंगच्या जोरावर व्यवसायाला नवीन झळाळी देत आहे. जिवीकाला आरव हा मुलगा असून पती वैभव यांचे प्रोत्साहन तिच्यासाठी मोलाची ठरली आहे. ती माजी नायब राज्यपाल डॉ. रजनी राय यांची नात सून आहे. संपन्नता असतानाही स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वडिलांच्या मदतीने व्यवसायात प्रवेश करुन आपली ओळख तिने निर्माण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sillod News : पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला; भराडीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT