Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: पैशांचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ५५ वर्षीय आरोपीला २० वर्षांची शिक्षा

Nagpur Girl Physically Assaulted: पैशाचे आमिष देत १४वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या ५५ वर्षीय इसमास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षांचा सश्रम दुहेरी कारावास, एकूण चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Minor Girl Physical Assaulted by 55 Years Old : पैशाचे आमिष देत १४वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या ५५ वर्षीय इसमास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षांचा सश्रम दुहेरी कारावास, एकूण चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तसेच, दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल. बळीराम तुलसीराम इरपाची (वय ५५, रा. शेरडी, ता. सावनेर) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर सावनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

न्यायाधीश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी निर्णय दिला. ही घटना ९ एप्रिल २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ दरम्यान घडली. पीडितेचे वडील, आई व भाऊ घरी नसताना नराधम बळीराम घरात शिरला. त्याने पीडित मुलीला कवटाळले. घाबरलेली पीडिता घराबाहेर पळून गेली.

त्यानंतर, दोन ते तीन दिवसांनी घरी कोणी नसल्याची संधी साधून बळीराम पुन्हा घरात शिरला व त्याने तिचे तोंड दाबून‌ अत्याचार केला. आरोपीला न्यायालयाने दंडासह वीस वर्षांची दुहेरी शिक्षा सुनावली. राज्य शासनातर्फे ॲड. रश्‍मी खापर्डे यांनी बाजू मांडली.

पीडिता सहा महिन्यांची गर्भवती
एकदा अत्याचार केल्यानंतर बळीरामची हिम्मत वाढली. तो किमान सात ते आठ वेळा पीडितेच्या घरी आला, त्याने तिला पैशांचे आमिष देखील दिले व शरीर संबंध प्रस्तापित केले. ऑक्टोबर २०१९ मध्ये पीडिता मामाच्या गावाला गेल्यानंतर तिला भोवळ आली, उलट्या झाल्या. दवाखान्यामध्ये नेले असता ती २७ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT