नागपूर

Nagpur: मला आईकडे जायचयं म्हणत, मुलाने उचललं टोकाचं पाऊल; अनेक महिन्यांपासून होता तणावात

दोन वर्षांआधी वारलेल्या आईच्या आठवणीत मुलगा तणावात गेला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur News: नागपूर, ता. २ दोन वर्षांपूर्वी आईचा मृत्यू झाला. ती स्वप्नात येते, मला तिची खूप आठवण येते, मला आईकडे जायचयं असे म्हणत २५ वर्षीय युवकाने टोकाचं पाऊल उचलले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

दुर्गाप्रसाद गोकुलप्रसाद पालीवाल (रा. गंगाबाग, पारडी) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गादास आणि त्याचा भाऊ नरेंद्र हे दोघेच वास्तव्यास होते. दुर्गादास राईसमीलमध्ये कामाला तर नरेंद्र कॅटरिंगचे काम करतो. त्यांचे वडील आठ वर्षापूर्वी तर आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. दुर्गादास आईच्या लाडाचा असल्याने तिच्या निधनाने त्याच्यावर मोठा परिणाम झाला. तो तणावात राहू लागला.

इंस्टाग्राम आणि इतर ठिकाणी तो सातत्याने आईविषयी पोस्ट करीत असे. आईची आठवण करीत तो नेहमीच रडायचा. 'मला आईची आठवण येते. मला आईच्या भेटीलाजायचे आहे. मी आई शिवाय जगू शकत नाही.' असे तो भावाला म्हणायचा. मागील दोन महिन्यांपासून तो कामावरदेखील गेला नव्हता. नरेंद्र हा दहा दिवसासाठी बाहेरगावी गेला होता. यादरम्यान तो मोबाइलने दुर्गादास याचेशी बोलायचा. मात्र, दोन दिवसांपासून त्याचा दुर्गादासशी संपर्क नव्हता. शिवाय दुर्गादासचे त्याच्या मित्रांशीही बोलणे झाले नव्हते.

शुक्रवारी सायंकाळी नरेंद्र घरी पोहचल्यावर त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्याला नरेंद्रला घरी छताच्या लोखंडी हुकाला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ नरेंद्रने दिलेल्या माहितीवरून पारडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र जाधव यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT