nagpur crime  esakal
नागपूर

Nagpur Crime: नागपुरात मुळशी पॅटर्नचा थरार! जुन्या वादातून मित्रांनीच केली मित्रांची हत्या; त्यानंतर केलं असं...

सकाळ डिजिटल टीम

बल्लारपूर: येथील केजीएन शाळेजवळ जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची दगड आणि धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. बुधवार (ता. ४) व गुरुवार (ता. १५) दरम्यानच्या रात्री दोन वाजता ही घटना घडली.

मृत तरुणाचे नाव दीपक कैथवास (वय १९) असून तो शहरातील रवींद्रनगर वस्तीतील राहणारा आहे. या प्रकरणातील चारही आरोपींनी आज गुरुवारी सकाळी पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्या कबुली दिली.

अर्जुन राजू कैथवास (वय २८), गौरव राजू लिडबे (२२), प्रथम शंकर पाटील (२५, तिघेही रा. मौलाना आझाद वॅार्ड, बल्लारपूर), आणि अमन दुखशौर कैथवास (२०, रा. बुद्ध नगरवार्ड) अशी आरोपींची नावे आहेत.

ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील यांच्या निरीक्षणात सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.

मृत दीपक आणि चारही आरोपींमध्ये जुना वाद होता. घटनेपूर्वी काल बुधवारी सायंकाळी दीपकचा मित्र भुऱ्या आणि आरोपी अर्जुन यांच्यात वाद आणि शाब्दिक बाचाबाची झाली. या वादानंतर दीपक, त्याचा मित्र भुऱ्या आणि अर्जुन निघून गेले.

मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दीपक हा केजीएन शाळेजवळ एकटा असल्याची माहिती अर्जुनला मिळाली. त्याने प्रथम, गौरव आणि अमन यांच्यासोबत केजीएन शाळा गाठली. तिथे दीपक एकटाच असल्याची संधी साधून चौघांनीही दगड, धारदार शस्त्राने त्याची हत्या केली.

हे हत्याकांड घडल्यानंतर अर्जुन, प्रथम, गौरव आणि अमन या चौघांनीही आज गुरुवारी सकाळी पोलिस ठाणे गाठले. तेथे त्यांनी हत्येची कबुली दिली. चारही आरोपींना हत्येच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी आरोपींचा पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाकडे मागितली. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या निरीक्षणात सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.

वर्षभरापूर्वी झाले कडाक्याचे भांडण

मौलाना आझाद वॉर्ड व बुद्धनगर वॉर्डातील या वस्तीतील तरुण अगोदर एकमेकांचे मित्र होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यात काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी योजना आखली होती.

मात्र, या कालावधीत त्यांनी तशी संधी मिळाली नाही. मात्र, बुधवारी रात्री संधी चालून आली. दीपक केजीएन शाळेच्या परिसरात एकटाच असल्याचे पाहून आरोपी तिथे पोहोचले व जुन्या वादाचा वचपा काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

Higher Education Protest: एम.फिल पात्र कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी ‘स्पुक्टो’चे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत धरणे

Solapur Health Crisis: मंगळवेढ्यात २७हून अधिक आरोग्य पदे रिक्त; भैरवनाथ उद्योग समूहाचे अनिल सावंत यांची आरोग्यमंत्र्याकडे तात्काळ भरतीची मागणी

Highway Crime : गोलटगाव फाट्यावर भरधाव वाहनासमोर उडी; २२ वर्षीय तरुणाने जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT